परशुराम हिंदू सेवा संघाची राज्य कार्यकारिणी बैठक १९ जानेवारी २०२५ रोजी पुण्यातील नारद मंदिर सभागृह येथे संपन्न झाली यावेळी प्रामुख्याने संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अनिल मुळे प्रदेशाध्यक्ष श्री विश्वजीत देशपांडे महिला अध्यक्ष डॉ संजीवनी पांडे प्रदेश सरचिटणीस अभय खेडकर विधीज्ञ आघाडीचे अध्यक्ष ऍड देविदास अण्णा शिंदे प्रदेश कार्याध्यक्ष उपेंद्र जपे पुणे जिल्हाध्यक्ष सागर मांडके यांची उपस्थिती होती.
या बैठकीत संघटनेच्या पुढील काळातील उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली सर्व जातीय हिंदू धर्म यांच्या व्रतबंध सोहळा आयोजित करणे देवस्थान इनाम जमिनी असलेल्या बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अजून तीव्र रूप देणे अशा प्रमुख बाबींवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली महाराष्ट्र राज्याच्या बजेट अधिवेशनापूर्वी देवस्थान इनाम जमिनी संदर्भात सकारात्मक निर्णय न आल्यास संघटनेच्या वतीने पुणे ते मुंबई मोर्चा काढण्यात येईल सदर मोर्चात या विषयाने बाधित असलेले ज्येष्ठ नागरिक उपस्थित असतील असा इशारा संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी दिला.
हेही वाचा..
महाराष्ट्रात चमत्कार, भोंदू हिंदुत्ववाद्यांचे ऐका नवे फुत्कार!
ब्रिटीश लेबर खासदार हिंदूंऐवजी जमात-ए-इस्लामीला भेटले
वाँटेड जिहादी जहीर अलीला आसाममध्ये पकडले
आंदोलनाला मारली दांडी; वडेट्टीवारांच्या मुलीसह ६० पदाधिकारी तडकाफडकी पदमुक्त
यावेळी राज्यातील विविध ठिकाणच्या बांधवांची संघटनेच्या पदांवर खालील प्रमाणे निवड करण्यात आली. श्री अभय खेडकर प्रदेश सरचिटणीस कारंजा, डॉ संजीवनी पांडे प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी चिंचवड, कु स्नेहल कांबळे प्रदेश सरचिटणीस महिला आघाडी मुंबई, डॉ श्रुती कुलकर्णी प्रदेश सरचिटणीस महिला आघाडी चिंचवड, श्री भगवानराव पाटील प्रदेश उपाध्यक्ष परभणी, ऍड देविदास अण्णा शिंदे अध्यक्ष विधीज्ञ आघाडी पुणे, श्री आदि रामचंद्र अध्यक्ष सांस्कृतिक आघाडी चिंचवड, सौ अनिता बल्लाळ जोशी धार्मिक उपक्रम आघाडी पुणे, श्री शिवाजी शिंदे समन्वयक लोककलावंत आघाडी अहील्यानगर, डॉ संजय मुंडेवाडी वैद्यकीय आघाडी अध्यक्ष सोलापूर, श्री सुनील कुलकर्णी समन्वयक देवस्थान इनाम जमिनी पुणे, श्री गजानन जोशी समन्वयक मराठवाडा देवस्थान इनाम जमिनी जालना, श्री आनंद कुलकर्णी मराठवाडा अध्यक्ष माजलगाव, श्री बल्लाळ जोशी कार्याध्यक्ष सोलापूर जिल्हा अकलूज, श्री गिरीश जोशी जिल्हाध्यक्ष मुंबई उपनगर गोरेगाव, श्री सागर मांडके जिल्हाध्यक्ष पुणे जिल्हा, श्री केदार पाटील जिल्हाध्यक्ष संभाजीनगर.
श्री अभिजीत दातार जिल्हाध्यक्ष रायगड अलिबाग, श्री विकास पित्रे जिल्हा उपाध्यक्ष रायगड अलिबाग, श्री ऋषिकेश कुलकर्णी विदर्भ संघटक शेगाव, श्री शैलेश खोपटिकर शहराध्यक्ष पुणे भाग 2, श्री रविंद्र देशपांडे प्रसिद्धीप्रमुख पुणे जिल्हा
सो अनुजा अनंत खडकेकर पहिला संघटक पुणे जिल्हा, सौ मानसी गोडबोले व्यापारी आघाडी प्रमुख
श्री प्रतीक इनामदार व्यापारी आघाडी समन्वयक, सौ रोहिणी कुलकर्णी शहर उपाध्यक्ष पुणे भाग 2
श्री प्रणव कुलकर्णी हडपसर विभाग अध्यक्ष, श्री प्रसाद खोत पुणे शहर चिटणीस भाग एक, श्री अमेय देशपांडे सोशल मीडिया संयोजक, श्री श्रीधर शेलार उपाध्यक्ष पुणे शहर भाग दोन, श्रीमती उषा वाल्हेकर संघटक पिंपरी चिंचवड
श्री अभय जोशी पुणे शहर उपाध्यक्ष भाग एक, कु शांभवी खेडकर युवती संघटक पुणे शहर, श्री संतोष बोर्डे पुणे जिल्हा उपाध्यक्ष, श्री सम्राट कानिटकर पुणे जिल्हा संयोजक सांस्कृतिक आघाडी, सौ तनया स्वप्नील सोहोनी सरचिटणीस पुणे शहर भाग 1, सौ वंदना देशपांडे पुणे शहर अध्यक्ष महिला आघाडी, श्री महेश अष्टेकर पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष.