पाक लष्करप्रमुख मुनीरना आम्ही बोलावलेले नाही!

अमेरिकेने दिले स्पष्टीकरण

पाक लष्करप्रमुख मुनीरना आम्ही बोलावलेले नाही!

In this picture taken on May 21, 2025 and released by Pakistan's Inter-Services Public Relations (ISPR), Field Marshal Syed Asim Munir (C) prays after laying wreath on the martyrs' monument during a guard of honor ceremony at General Headquarters (GHQ) in Rawalpindi. (Photo by HANDOUT / Pakistan's Inter-Services Public Relations (ISPR) / AFP) / XGTY / RESTRICTED TO EDITORIAL USE - MANDATORY CREDIT "AFP PHOTO/Pakistan's Inter Services Public Relations (ISPR)" - HANDOUT - NO MARKETING NO ADVERTISING CAMPAIGNS - DISTRIBUTED AS A SERVICE TO CLIENTS

अमेरिकेच्या २५०व्या लष्करी वर्धापनदिनानिमित्त आयोजित परेडमध्ये पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना निमंत्रण दिल्याच्या वृत्तांचे अमेरिकेने खंडन केले आहे. हे वृत्त खोटं आहे. कोणत्याही परदेशी लष्करी नेत्याला या परेडसाठी आमंत्रित करण्यात आलेले नाही,” असे व्हाइट हाउसच्या अधिकाऱ्यांनी ANI या वृत्तसंस्थेला सांगितले. मुनीर यांना अमेरिकेने आमंत्रित केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर काँग्रेसने त्यावरून रणकंदन करण्यास सुरुवात केली होती. पण अमेरिकेनेच आता ते वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे.

या वृत्तांवरून भारतामध्ये राजकीय वादंग उफाळले. काँग्रेस पक्षाने याला भारतासाठी धोरणात्मक आणि राजनैतिक अपयश ठरवले. विशेषतः ऑपरेशन सिंदूरनंतर ज्यात भारताने पाकिस्तान आणि पाक-व्याप्त काश्मीरमध्ये अचूक दहशतवादी कारवायांवर हल्ले केले होते.

जयराम रमेश (काँग्रेस) यांनी X वर लिहिले, १४ जून रोजी अमेरिकन आर्मी डेच्या निमित्ताने वॉशिंग्टन डीसीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी पाक लष्करप्रमुख असीम मुनीर यांना आमंत्रण देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हे भारतासाठी मोठं राजनैतिक व धोरणात्मक अपयश आहे. हेच असीम मुनीर होते, ज्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या आधी भडकाऊ वक्तव्ये केली होती. मग प्रश्न असा निर्माण होतो की अमेरिकेचा हेतू काय आहे?

हे ही वाचा:

ट्रंप यांनी इराणला काय दिला इशारा ?

मुंबईतील अमेरिकन महावाणिज्य दूतावास कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

वाराणसीत योग सप्ताहाचा भव्य शुभारंभ

‘इंसुलिन प्लांट’ मधुमेह रुग्णांसाठी खास मित्र

भाजपचा काँग्रेसवर पलटवार

भाजपने काँग्रेसच्या आरोपांचे खंडन करत जयराम रमेश यांच्यावर खोट्या बातम्या पसरवण्याचा आरोप केला. भाजप आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी लिहिले, पंतप्रधान मोदींविरोधातील अतिद्वेषामुळे जयराम रमेश यांनी जनरल असीम मुनीर यांना अमेरिकेच्या परेडसाठी आमंत्रण दिल्याचा खोटा दावा केला. हे केवळ खोटी माहिती पसरवणं नव्हे, तर भारताच्या परराष्ट्र धोरणावरही शंका निर्माण करणं आहे, जे प्रत्यक्षात पाकिस्तानच्या अजेंड्याला मदत करतं.

अमेरिकन लष्करी परेड

परेड रविवार, १४ जून रोजी वॉशिंग्टनमध्ये आयोजित करण्यात आली आहे. अमेरिकन लष्कराच्या स्थापनेच्या २५०व्या वर्षपूर्तीनिमित्त ही परेड आयोजित केली जाते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा वाढदिवस (१४ जून) देखील याच दिवशी असल्याने, ते परेडमध्ये सॅल्यूट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. परेडमध्ये हजारो सैनिकी जवान, टँक्स, हेलिकॉप्टर्स, पॅराशूट जवान आणि युद्धविमानांची उड्डाणं यांचा समावेश होता. अमेरिकेत अशा प्रकारच्या लष्करी परेड्स दुर्मिळ आहेत. याआधी अशी मोठी परेड १९९१ साली गल्फ युद्धातील विजयानंतर झाली होती.

Exit mobile version