भाजपा आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला आता जोरात सुरुवात झाली असून विविध प्रभागांमध्ये उमेदवार सकाळपासूनच लोकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणूक प्रचार कार्यालयाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांशी संवाद साधण्याची, त्यांच्यापर्यंत आपल्या कार्याची माहिती पोहोचवण्यात येत आहे.
हे ही वाचा:
‘समुद्र प्रताप’ बजावणार महत्त्वाची भूमिका
संजय कांबळे यांचा प्रचाराचा झंझावात
महायुतीच्या उमेदवार स्वाती जयस्वाल यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
हे ड्रग्सचे नाही, तेलाचे प्रकरण
वॉर्ड क्रमांक २७ मधून भाजपा–शिवसेना–आरपीआय महायुतीच्या उमेदवार निलम सुनिल गुरव यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटनही आमदार भातखळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. जनतेचा मूड स्पष्टपणे महायुतीच्या बाजूने दिसतो आहे. विजय पक्का आहे, अशी टिप्पणी भातखळकरांनी केली.
