28 C
Mumbai
Tuesday, February 3, 2026
घरराजकारण“राहुल गांधी हे ‘अर्धवेळ राजकीय नेते’!”

“राहुल गांधी हे ‘अर्धवेळ राजकीय नेते’!”

राहुल यांच्या जर्मनी दौऱ्यावरून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची खोचक टीका

Google News Follow

Related

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बुधवार, १० डिसेंबर रोजी संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या जर्मनी दौऱ्यावर टीका केली. तसेच काँग्रेस खासदार राहुल गांधी हे “अर्धवेळ राजकीय नेते” आहेत असे म्हणत खोचक टीका केली.

“राहुल गांधी संसदेचे अधिवेशन सुरू असताना बहुतेक वेळ परदेशात घालवतात आणि नंतर म्हणतात की त्यांना बोलण्याची संधी मिळत नाही. बिहार निवडणुकीदरम्यानही ते परदेशात होते. ते अर्धवेळ काम करतात, गंभीर राजकीय नेते नाहीत,” असे प्रल्हाद जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

भारतीय निवडणूक आयोग भाजपाशी संगनमत करत असल्याच्या गांधी यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, काँग्रेस हरल्यावर ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाला दोष देते. “मी त्यांना विचारू इच्छितो की, कर्नाटकात जिंकल्यावर तुम्ही काय म्हणालात? झारखंडमध्ये जेव्हा इंडी आघाडी जिंकली, तेलंगणात जिंकली, तेव्हा तुम्ही काय म्हणालात? पण जेव्हा तुम्ही हरता तेव्हा तुम्ही इव्हीएम, निवडणूक आयोगाला दोष देता. त्यांना असे म्हणायचे आहे की जेव्हा विजय होतो तेव्हा तो त्यांच्यामुळे होतो, पण जेव्हा ते हरतात तेव्हा तो व्यवस्थेमुळे हरतात,” अशी टीका प्रल्हाद जोशी यांनी केली.

हे ही वाचा:

गोव्यातील नाईट क्लबचा सह-मालक अजय गुप्ताला अटक

मायक्रोसॉफ्ट भारतात १.५ लाख कोटी रुपये गुंतवणार

पाच दिवसात ‘धुरंधर’ने कमावले १५० कोटी

बडतर्फ शिपाई आलोक सिंह, अमित सिंह टाटाला न्यायालयीन कोठडी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आगामी बर्लिन दौऱ्यामुळे एका नवीन राजकीय वादळाला सुरुवात झाली आहे. लोकसभेचे महत्त्वाचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाही भाजपने त्यांच्या परदेश दौऱ्यावर टीका केली आहे. राहुल गांधी १७ डिसेंबर रोजी बर्लिनमध्ये होणाऱ्या इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, जिथे ते युरोपमधील आयओसी नेत्यांना भेटतील. भाजप नेते शहजाद पूनावाला यांनीही राहुल गांधी यांना ‘विदेश नायक’ असे संबोधून विरोधी पक्षनेतेपदाच्या कर्तव्यांपेक्षा परदेश दौरा निवडल्याबद्दल खिल्ली उडवली. पोस्टमध्ये शहजाद पूनावाला म्हणाले की, “पुन्हा एकदा ‘विदेश नायक’ जे सर्वोत्तम करतो ते करत आहे; परदेश दौऱ्यावर जात आहे. संसद १९ डिसेंबरपर्यंत सुरू आहे पण राहुल गांधी १५- २० डिसेंबर दरम्यान जर्मनीला भेट देतील. बिहार निवडणुकीदरम्यानही ते परदेशात होते आणि नंतर जंगल सफारीमध्ये होते,” असे ते म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा