रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री

केंद्रीय नेतृत्वाने दाखवला विश्वास

 रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून चळवळीत काम करता करता रेखा गुप्ता या आता दिल्लीच्या मुख्यमंत्री होणार आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपला दणदणीत यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण याविषयी चर्चा होती, अखेर रेखा गुप्ता यांच्या रुपात एका महिलेला ही संधी देण्यात आली आहे.

रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री असतील. याआधी आतिशी मार्लेना, शीला दीक्षित आणि सुषमा स्वराज यांनी ही जबाबदारी पार पडलेली आहे.

रेखा गुप्ता यांनी आपल्याला मिळालेल्या या संधीबद्दल पतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. त्याशिवाय, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, वीरेंद्र सचदेव, रवी शंकर, ओ पी धनकर यांचेही आभार मानले आहेत. रेखा गुप्ता प्रथमच आमदार झाल्या आहेत आणि त्यांना थेट मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे.

हे ही वाचा:

राहुलबाबा तुम्हाला छत्रपतींचे नाव पेलवणार नाही?

कारवार नौदल तळाची माहिती लीक करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

पाच राज्यांना १५५४.९९ कोटींचा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी मंजूर

छत्रपती शिवरायांचे किल्ले कोणत्याही मंदिरापेक्षा मोठे!

गुरुवारी रेखा गुप्ता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. रामलीला मैदानात होणाऱ्या या सोहळ्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या कॅबिनेटमधील तसेच एनडीएतील अनेक सदस्य उपस्थित राहणार आहेत. रेखा गुप्ता यांनी कायद्याचे शिक्षण घेतले असून त्या बनिया समाजाच्या आहेत. केजरीवाल देखील बनिया समाजाचे होते.

रेखा गुप्ता या दक्षिण दिल्लीत महापौरही होत्या त्यामुळे त्यांच्याकडे दिल्लीच्या समस्यांविषयी चांगली माहिती आहे.

Exit mobile version