28 C
Mumbai
Thursday, April 30, 2026
घरराजकारणपुतीन यांना मोदींनी गीता दिली म्हणजे हिंदू धर्मात धर्मांतरित केले नाही!

पुतीन यांना मोदींनी गीता दिली म्हणजे हिंदू धर्मात धर्मांतरित केले नाही!

शशि थरूर यांनी लगावला टोला

Google News Follow

Related

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन भारत दौऱ्यावर असताना काँग्रेसचे नेते शशि थरूर हे आयोजित केलेल्या शाही खान्यात सहभागी झाले. तेव्हा पुतीन यांना मोदींच्या हस्ते भगवद् गीता प्रदान करण्यात आल्याबद्दल विचारल्यावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले.

पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना भगवद्गीता भेट दिल्याबद्दल थरूर म्हणाले, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना रशियन भाषेतील गीता प्रदान करणे म्हणजे ही पुतिन यांना हिंदू धर्मात धर्मांतरित करणे नाही. आपल्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशातील मूलभूत शिकवण दुसऱ्या संस्कृतीला देणे हा त्यामागचा उद्देश आहे. त्यात काही चुकीचे नाही.”

ते पुढे म्हणाले की १९८९ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या “The Great Indian Novel” मध्येही त्यांनी भारतीय महाकाव्यांची ओळख इंग्रजीतून शिकणाऱ्यांनाही व्हावी असा मुद्दा मांडला होता.

शनिवार काँग्रेसचे नेते आणि तिरुवनंतपुरमचे खासदार शशि थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना रशियन भाषेतील भगवद्गीतेची प्रत भेट दिल्याबद्दल कौतुक केले.

मात्र त्यांनी ही खंत व्यक्त केली की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुतिन यांच्या सन्मानार्थ आयोजित राज्यभोजनासाठी विरोधी पक्षातील नेत्यांपैकी विशेषत: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना आमंत्रित केले गेले नाही.

बंगलोर साहित्य महोत्सवात थरूर यांची प्रतिक्रिया

थरूर बेंगलोर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या ‘A Wonderland of Words’ या पुस्तकावर श्रोत्यांसोबत झालेल्या संवादानंतर पत्रकारांशी बोलत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्यांची भाची रागिनी थरूर श्रीनिवासन करत होती.

थरूर म्हणाले, “राज्यभोजन हा नेहमी परदेशी राष्ट्रप्रमुखांना दिला जाणारा सन्मान असतो. मी विवादात पडू इच्छित नाही, पण आपल्या सारख्या लोकशाहीत विरोधी पक्षातील नेते अशा कार्यक्रमात असणे योग्यच ठरले असते. मी तर परराष्ट्र व्यवहार समितीचा अध्यक्ष म्हणून तिथे होतो आणि काही रोचक चर्चा देखील झाल्या.”

ते पुढे म्हणाले, परदेशी राष्ट्रप्रमुखाच्या सन्मानार्थ राष्ट्रपतींकडून आलेले आमंत्रण नाकारणे माझ्या भूमिकेनुसार योग्य ठरले नसते.

हे ही वाचा:

कोहलीची नवी बादशाही!

भारताचा आफ्रिकेवर ‘यशस्वी’ मालिकाविजय!

डीजीसीएचा इंडिगोला कठोर इशारा!

यशस्वीची किमया! तीनही फॉर्मेटमध्ये शतक ठोकणारा सहावा भारतीय

वैवाहिक बलात्काराबाबत थरूर ठाम

हिवाळी अधिवेशनात थरूर यांनी वैवाहिक बलात्काराला गुन्हेगारीच्या कक्षेत आणण्यासाठी विधेयक सादर केले आहे.

थरूर म्हणाले, “बायका हिंसाचाराच्या सर्वात मोठी बळी आहेत. अनेक प्रकरणांत नवरे पत्नीपासून वेगळे राहतात किंवा त्यांना सोडून देतात, आणि नंतर इच्छेनुसार बलात्कार करतात. कारण कायद्यात त्यासाठी शिक्षा नाही. त्यांनी सांगितले की, भारतीय कायदे अजूनही पितृसत्ताक मानसिकतेत अडकलेले आहेत. स्त्रियांना त्यांच्या शरीराचा, त्यांची स्वायत्तता जपण्याचा अधिकार दिलाच पाहिजे. “नाही म्हणजे नाही” हे वैवाहिक नात्यातही तेवढेच लागू होते.

थरूर म्हणाले की, आपल्या देशात बलात्कार हा गुन्हा आहे. पण कायद्यात एकच अपवाद आहे पती. घटस्फोट होईपर्यंत तो पतीच असतो आणि हवे ते करू शकतो. हा अपवाद तातडीने काढून टाकला पाहिजे.

ते पुढे म्हणाले, विवाहानंतर शारीरिक संबंध हे प्रेमातून होत असतात, हिंसेतून नाही. हिंसा म्हणजे बलात्कार प्रेम नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा