निवडणुक अर्जात खरी माहिती लपवून ठेवल्याप्रकरणी धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस

करुणा शर्मा यांनी केला होता आरोप

निवडणुक अर्जात खरी माहिती लपवून ठेवल्याप्रकरणी धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस

मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड म्हणून संशयित आरोपी वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडेंच्या यांच्या अडचणी वाढल्या असतानाचं आता परळीच्या फौजदारी न्यायालयाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस धाडली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडवल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना खरी माहिती लपवून ठेवल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला होता. शिवाय याप्रकरणी त्यांनी न्यायालयाची दारेही ठोठावली होती. आता करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या ऑनलाइन तक्रारीच्या अनुषंगाने परळीच्या फौजदारी न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. याबाबत २४ फेब्रुवारी २०२५ रोजी परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे तक्रारदाराचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसेच करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता. मात्र, करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता. यावर आक्षेप घेत करुणा मुंडे यांनी परळीतील फौजदारी न्यायालयात ऑनलाइन तक्रार केली होती. त्यानंतर न्यायालयाने आता या तक्रारीची दखल घेत नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे.

हे ही वाचा:

वादानंतर समय रैनाने ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शो चे सर्व व्हिडीओ हटवले

भारतीय वंशाच्या गुप्तचर प्रमुख तुलसी गॅबार्ड यांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट; कोणत्या विषयांवर झाली चर्चा?

पवारांच्या प्रशंसेचा अर्थ ठाकरेंच्या लक्षात आलाय…

ठाकरेंना सोडून राजन साळवी आले शिंदेंकडे!

प्रकरण काय?

फौजदारी न्यायालयामध्ये धनंजय मुंडे यांनी यांना कारणे दाखवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी २४ फेब्रुवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे. करुणा शर्मा यांनी याबाबत तक्रार अर्ज केलेला होत. या अर्जात निवडणूक उमेदवारी भरताना खरी माहिती दडवण्याचा आरोप आहे. धनंजय मुंडे यांनी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसेच करुणा मुंडे यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता. मात्र, करुणा मुंडे यांच्या नावाच्या मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता. या आरोपाखाली हा अर्ज करण्यात आला होता. यावरच नायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान, करुणा शर्मा यांच्या पोटगी प्रकरणावरिल निकाल गुरुवारी (दि. ६) वांद्रे न्यायालयाने दिला. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पत्नी करुणा शर्मांना महिन्याला दोन लाख रुपयांची पोटगी द्यावी, असे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले होते.

Exit mobile version