कॉमेडियन समय रैना आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर रणवीर अलाहबादिया उर्फ बीअर बायसेप्स हे त्यांच्या एका युट्युबवरील कार्यक्रमामुळे अडचणीत आले आहेत. यासंबंधी पोलीस चौकशी सुरू आहे. दरम्यान, कॉमेडियन समय रैना याने बुधवारी या प्रकरणावर मौन सोडले आहे. त्याने त्याच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शो चे सर्व व्हिडीओ काढून टाकल्याचे म्हटले आहे. तसेच सर्व तपास यंत्रणांना आपण सहकार्य करणार असल्याचे समय याने स्पष्ट केले आहे.
‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या शेवटच्या भागात आक्षेपार्ह विनोदावरून वादंग निर्माण झाला होता. यानंतर सोशल मीडियावरही हे प्रकरण चांगलेच तापले होते. आता हा भाग प्रसारित झाल्यानंतर तीन दिवसांनी समय रैना याची टिप्पणी आली आहे. या वादावर प्रतिक्रिया देताना, समय रैना याने इंस्टाग्राम स्टोरी तसेच एक्स वर एक पोस्ट केली आहे. त्याने लिहिले आहे की, “जे काही घडत आहे ते माझ्यासाठी खूप जास्त आहे. मी माझ्या चॅनेलवरून ‘इंडियाज गॉट लेटेंट’चे सर्व व्हिडिओ काढून टाकले आहेत. माझा एकमेव उद्देश लोकांना हसवणे आणि मजा करणे हा होता. सर्व एजन्सींच्या चौकशी निष्पक्षपणे पूर्ण करण्यासाठी मी त्यांना पूर्ण सहकार्य करेन. धन्यवाद.”
समय रैनाचा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा कार्यक्रम त्याच्या कंटेंटमुळे वादात सापडला आहे. रणवीर अलाहबादिया याला ‘इंडियाज गॉट लॅटेंट’च्या एका भागात बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी त्याने एका स्पर्धकाला पालकांच्या बाबतीत आक्षेपार्ह प्रश्न विचारले. यावरून वाद निर्माण झाला आणि तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर रणवीर याने माफी मागत म्हटले की, त्याची टिप्पणी केवळ अनुचित नव्हती, ती मजेदारही नव्हती. विनोद हा माझा गुण नाही. मी फक्त माफी मागण्यासाठी आलो आहे.
हे ही वाचा:
पवारांच्या प्रशंसेचा अर्थ ठाकरेंच्या लक्षात आलाय…
ठाकरेंना सोडून राजन साळवी आले शिंदेंकडे!
जीबीएसचा बळी, मुंबईत पहिल्या मृत्यूची नोंद
काँग्रेसचा माजी खासदार सज्जन कुमार दोषी
दरम्यान, केंद्र सरकारच्याच्या सूचनेनंतर, युट्युबने कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ शोमधील वादग्रस्त भाग काढून टाकण्यात आला होता. रणवीर अलाहबादिया याने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे यावरून त्याच्यावर प्रचंड टीका झाली आणि तक्रारीही करण्यात आल्या. पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे. तर, या वादाच्या पार्श्वभूमीवर, मार्च आणि एप्रिलमध्ये गुजरातमधील अहमदाबाद आणि सुरतमधील कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.