देशातला महत्त्वाचा प्रकल्प आणि इंजिनियरिंगमधील एक अनोखा आविष्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे बोरिवली दुहेरी भुयारी मार्गासाठीचे टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) लाँचिंग मंगळवारी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत या महाकाय बोरिंग मशिनचे उद्घाटन झाले. या माध्यमातून हा भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे.
यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हा मार्ग ११.८४ किमी आहे. यातला बोगदा १०.२५ किमी आहे. बोरिंग मशीन या बोरवलीकडून ५.७५ किमी ठाण्याकडून ६.०९ किमी असे बोरिंग होईल. सहा पदरी मार्ग होईल. प्रत्येक बोगद्यात २ वाहतूक व आपातकालीन अशा तीन मार्गिका असतील. प्रत्येक ३०० मीटरवर आडवे मार्ग असतील.
हे ही वाचा:
खरातच्या व्हिडीओची विक्री, महाराष्ट्र सायबर सेल कडून गुन्हा
जिम बंद झाल्याच्या रागातून सोमय्यांचा नामफलक पेटवला
पश्चिम बंगालमध्ये निवडणूकीसाठी अभूतपूर्व सुरक्षा
इराण तणावाचा परिणाम: सोनं ₹१.५ लाखांवर, चांदीतही जोरदार उसळी
फडणवीस म्हणाले, सुरुवातीच्या काळात हा प्रकल्प एमएसआरडीसीकडे होते नंतर तो एमएमआरडीएकडे आला. १६ हजार ६०० कोटी खर्च करून हे काम हातात घेतलंय. या प्रकल्पामुळे प्रवासासाठी लागणारा ९० मिनिटांचा वेळ १५ मिनिटांवर येणार आहे. आता २३ किमी अंतर आहे ते १२ किमी होईल. प्रदूषणात घट होईल. हा प्रकल्प मे २०२८पर्यंत पूर्ण होईल.
फडणवीसांनी सांगितले की, मेगा इंजिनिअरिंग या कंपनीने ऐतिहासिक काम घेतलेले आहे. नायक (संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील फुलपाखरू आणि अर्जुन (जुने झाड) अशी या दोन टीबीएमची नावे आहेत. हे १३.३४ मीटर व्यासाचे टीबीएम वापरत आहोत. उत्खननात टीबीएम शिल्ड वापरले जाईल. लोकांनाही त्रास होणार नाही. ठाणे कोस्टल रोडशी ते जोडले जाईल. ठाण्याची गर्दी कमी होईल. बोरिवली आणि बाजूला असलेल्या उड्डाण पुलाशीही ते जोडले जाईल. दहिसर, अंधेरी बोरिवली प. वाहतूकीचा भार कमी होईल. घोडबंदर रोडवरील रहदारी कमी होईल.
फडणवीस म्हणाले की, हा कदाचित सर्वात मोठा शहरी बोगदा असेल. तो सर्वात खोलही असेल. यासंदर्भात खूप चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग. सगळ्या परवानग्या मिळाल्या आहेत. पर्यावरणपूरक बाबी करतो आहोत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीखालून हा मार्ग जातोय. पण त्याचा जैवविविधतेवर परिणाम नाही. तरीही ११ हजार वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. हा ठाणे मुंबईला जोडून रहदारीची गर्दी थांबवली जाईल. ठाण्यातून हे काम सुरू होणार असल्यामुळे उपमुख्यमंत्र्यांचे त्यावर लक्ष असेल.







