वॅक्सीन गोदामात ठेऊन ठाकरे सरकार करतय लॉकडाऊनचा विचार

वॅक्सीन गोदामात ठेऊन ठाकरे सरकार करतय लॉकडाऊनचा विचार

महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर एक खळबळजनक बाब समोर आली आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला देण्यात आलेल्या ५४.१७ लाख लशींपैकी १२ मार्च पर्यंत केवळ २३.९८ लाख म्हणजे निव्वळ ४४.२६ टक्के लशीच वापरल्या गेल्या आहेत. राज्य सरकार कोविड-१९ विरोधात विविध शहरांमध्ये लॉकडाऊन करत आहे तर अनेक शहरांमध्ये पुन्हा नाईट कर्फ्यू आणत आहे. परंतु यामध्ये लसीकरण मोहिम अधिक तीव्रतेने का राबवली जात नाही? हा प्रश्न आहे.

महाराष्ट्रात गेले १५ दिवस कोविड-१९ च्या केसेसमध्ये पुन्हा झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनेक वेळा फेसबुक लाईव्ह करून, जनतेला लॉकडाऊन हवा आहे का? असा प्रश्न विचारात आहेत. जे मास्क वापरणार नाहीत त्यांना लॉकडाऊन हवा आहे असे मी समजेन असेही ते म्हणाले होते. याशिवाय राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये वाढत्या कोविड-१९ केसेसच्या पार्श्वभूमीवर पुन्हा कठोर लॉकडाऊन करण्यात आला आहे. जालना, परभणी, यवतमाळमध्येही अशा पद्धतीने लॉकडाऊन करण्यात आला आहे. याशिवाय कल्याण-डोंबिवलीमध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील मुंबईत नाईट कर्फ्यु लागू करण्यावर येत्या दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.

हे ही वाचा:

खारफुटीच्या कत्तलीवर तथाकथित पर्यावरणप्रेमींचे मौन

वरूण देसाईंना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून सचिन वाझेंची वकिली?

विरोधकांकडून सरकारवर निशाणा

अखेर सचिन वाझे याचे निलंबन

परंतु नव्याने हाती आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने मिळालेल्या लसीदेखील नागरिकांना दिलेल्या नाहीत. याचा अर्थ लसीकरणावर लक्ष न देता सरकार केवळ लॉकडाऊनच्या मागे असून, निर्बंध लादून कोविड-१९ वर नियंत्रण आणता येईल असा सरकारचा समज असल्याचे जाणवते.

Exit mobile version