पश्चिम बंगालमधील सामुदायिकदृष्ट्या अति-संवेदनशील असलेल्या मुर्शिदाबादमध्ये शनिवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले. निलंबित तृणमूल काँग्रेस आमदार हमायून कबीर याने मोठ्या सुरक्षाव्यवस्थेत ‘बाबरी मशीद’च्या धर्तीवर बांधण्यात येणाऱ्या मशिदीसाठी वीट रचली. ही घटना ६ डिसेंबर १९९२ रोजी झालेल्या बाबरी मशीद पाडण्याच्या वर्धापनदिनाशी जुळवून करण्यात आली होती.
कार्यक्रमातील धार्मिक विधी आणि जमावाची गर्दी
दुपारी कुरआन पठण करण्यात आले, त्यानंतर मशिदीच्या बांधकामासाठी वीट रचण्यात आली. कबीरच्या मते, हजारो लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि सौदी अरेबियातून दोन धर्मगुरूही आले होते. कार्यक्रमस्थळी “नारा-ए-तकबीर” आणि अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्या जात होत्या.
सोशल मीडियावर दिसलेल्या व्हिडिओंमध्ये, आमदारांच्या समर्थकांना डोक्यावर विटा घेऊन जाताना दिसले.
बेलडांगा परिसरात कार्यक्रम होत असताना रायट पोलीस व केंद्रीय सुरक्षा दलांनी कडेकोट सुरक्षा तैनात केली होती, जेणेकरून कोणताही सामुदायिक संघर्ष होऊ नये.
हे ही वाचा:
नवी दिल्लीत भारत- अमेरिका व्यापार चर्चा करणार
साक्षात सोनम कपिल साळुंखेची राज्यस्तरीय शालेय कबड्डीसाठी निवड
हिंदू सेनेने बाबर रोडवर लावले अयोध्या मार्गाचे पोस्टर
पाकिस्तान- अफगाणिस्तान संघर्ष पुन्हा पेटला; सीमा भागात गोळीबार
मुर्शिदाबाद : संवेदनशील पार्श्वभूमी
मुर्शिदाबाद जिल्ह्यात सुमारे ६७% मुस्लिम लोकसंख्या आहे आणि हा भाग सामुदायिक तणावासाठी म्हणून ओळखला जातो. एप्रिल महिन्यात वक्फ विधेयकाविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान पाच जणांचा मृत्यू झाला होता.
मोठा जमाव, प्रचंड खर्च
शनिवारी कार्यक्रम सुरळीत पार पडावा म्हणून आयोजकांनी सुमारे ३ हजार स्वयंसेवक तैनात केले होते, जेणेकरून वाहतूक कोंडी होऊ नये आणि NH-12 मार्ग खुला राहावा. सात केटरिंग एजन्सींना सुमारे ४० हजार पाहुणे आणि २० हजार स्थानिकांसाठी ‘शाही बिर्याणी’ बनवण्याचे काम देण्यात आले होते.
कबीरचे एक निकटवर्तीय म्हणाले की, फक्त जेवणावरच जवळपास ३० लाख रुपये खर्च झाले तर कार्यक्रमाचा एकूण खर्च ७० लाख रुपयांपेक्षा अधिक होता कबीरला या प्रकल्पामुळे याच आठवड्यात पक्षाने निलंबित केले आहे.
या कार्यक्रमाची घोषणा त्यांनी काही दिवसांपूर्वी केली होती आणि त्यानंतरपासूनच भाजपाकडून प्रचंड टीका सुरू झाली होती.
भाजपाची टीका
भाजपाने या कार्यक्रमावर तीव्र टीका केली. भाजपा प्रवक्ते अमित मालवीय यांनी म्हटले की, “ही मशिद धार्मिक नसून राजकीय योजना आहे. भावना पेटवणे आणि मतबँक घट्ट करणे हेच उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बंगालला अस्थिरतेकडे ढकलत आहेत. भाजपाचे माजी अध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, “२०२६च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी तृणमूल जाणूनबुजून तणाव निर्माण करत आहे. हमायून कबीरला ‘फ्रीलान्सर’प्रमाणे वापरले जात आहे.”
राम मंदिराचा उल्लेख करत घोष म्हणाले, “आता मंदिर बांधले गेले आहे, त्यामुळे बाबरी मशीद विसरण्याची वेळ आली आहे.”







