पश्चिम बंगालमधील परिस्थिती भयावह- राज्यपाल जगदीप धनकर

पश्चिम बंगालमधील परिस्थिती भयावह- राज्यपाल जगदीप धनकर

पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर उसळलेल्या हिंसाचारात अनेक हिंदूंची हत्या करण्यात आली. अनेक महिलांवर बलात्कार झाले. या सगळ्याचे व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये वायरल होत आहेत. तरीही ममता बॅनर्जींचे सरकार असा प्रकार घडलंच नसल्याचे सांगत आहे. अशा वेळी आता पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांनाच या विषयात लक्ष घालावं लागलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच लागलेल्या निवडणूक निकालांनंतर झालेला प्रचंड हिंसाचार हा राजकीय नाही तर जिहादी मानसिकता दाखविणारा आहे, असा सूर आता उमटू लागला आहे. बंगालमध्ये याआधीही दंगली, जाळपोळ, लुटालूट होत असे पण यावेळी निवडणुकीनंतर झालेले आक्रमण हे प्रामुख्याने हिंदू समाजावर झालेले आक्रमण आहे. भाजपाशी संबंधित विविध व्यक्तींवर झालेले हे सामुदायिक आक्रमण आहे. हे आक्रमण एवढे तीव्र होते की, ज्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी काम केले, त्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली. त्यासाठी जेसीबी, बुलडोझरही वापरण्यात आले. ही जिहादी मानसिकता नाही तर काय आहे?

हे ही वाचा:

ठाकरे सरकार जाणुनबुजून लस उपलब्ध करुन देत नाहीये

अमेरिकेवर मोठा सायबर हल्ला

ऑलिंपियन कुस्तीगीर सुशील कुमारचा शोध घेण्यासाठी ‘लूकआऊट’ नोटीस

सोनियांचे चरणचाटण उपयोगी पडलेले दिसत नाही- अतुल भातखळकर

“पश्चिम बंगालमधील स्थिती अत्यंत भयावह आहे. मी हिंसाचार झालेल्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरता प्रशासनाला तसे आदेशही दिले आहेत. परंतु प्रशासन यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. मी माझ्या निर्धारित कार्यक्रमाप्रमाणे घटनास्थळी जाणार आहे. सगळं काही आलबेल आहे, हिंसासाचार घडतच नाहीये असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. राज्य सरकारने याबाबत दोषींवर कारवाई केली पाहिजे.” असे राज्यपाल जगदीप धनकर म्हणाले.

Exit mobile version