31 C
Mumbai
Monday, October 3, 2022
घरराजकारणसोनियांचे चरणचाटण उपयोगी पडलेले दिसत नाही- अतुल भातखळकर

सोनियांचे चरणचाटण उपयोगी पडलेले दिसत नाही- अतुल भातखळकर

Related

‘संजय राऊत यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही आणि सामनाही वाचत नाही’ असे सांगून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना तोंडावर पडले आहे. महाविकास आघाडीतील या टोलेबाजूमुळे विरोधी पक्षांना ठाकरे सरकारचा समाचार घेण्याची चांगलीच संधी मिळाली आहे. यावरच ट्विट करत भाजपाचे आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

“पवारांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी भाजपविरोधी आघाडीची टिमकी वाजवणाऱ्या संजय राऊत यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही आणि सामनाही वाचत नाही’ असे सांगून काँग्रेसने जबरदस्त ठोकले आहे. शिवसेनेला या उठाठेवी करण्याचे कारणच काय असेही  सुनावले आहे. सोनियांचे चरणचाटण उपयोगी पडलेले दिसत नाही.” असे ट्विट अतुल भातखळकरांनी केले आहे.

संजय राऊत यांनी काल (९ मे) “लवकरच राष्ट्रीय महाविकास आघाडी स्थापन करू” अशी घोषणा केली होती. याकरता काँग्रेस पक्षाला केंद्रासाठी ठेऊन आघाडी उभी करावी लागेल, असेही ते म्हणाले होते. संजय राऊत यांच्या या विधानाचाच नाना पटोलेंनी समाचार घेतला आहे.

हे ही वाचा:

अमरावतीत १५ मे पर्यंत पुन्हा लॉकडाऊन

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी राज्यांनी लस खरेदी करावी

निर्मला सीतारामन यांचे ममता बॅनर्जींना प्रत्यत्तर

ठाकरे सरकार कोविडची आकडेवारी लपवतंय- प्रवीण दरेकर

“खरं म्हणजे संजय राऊत कायमच इतरांवर टीका करत असतात. पण केवळ दुसऱ्यांवर टीका केल्याने आपला पक्ष वाढत नसतो, हे कदाचित त्यांना माहिती नसावं.” असाही नाना पाटोले म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,969चाहतेआवड दर्शवा
1,945अनुयायीअनुकरण करा
41,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा