29 C
Mumbai
Saturday, June 19, 2021
घर विशेष अमरावतीत १५ मे पर्यंत पुन्हा लॉकडाऊन

अमरावतीत १५ मे पर्यंत पुन्हा लॉकडाऊन

Related

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा हाहा:कार पाहायला मिळत आहे. अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांचा स्फोट होत आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा प्रशासनाने पुढील सात दिवस संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी याबाबतची घोषणा केली. त्यानुसार रविवारी ९ मे दुपारी १२ वाजल्यापासून १५ मे पर्यंत अमरावती जिल्हा संपूर्ण बंद राहणार आहे.

अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावतीत कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे. त्यामुळे येत्या १५ मे पर्यंत अमरावतीत कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात फक्त मेडिकलची दुकान आणि हॉस्पिटल्स सुरु राहणार आहेत. बाकी इतर सर्व दुकाने बंद राहतील

तसेच या लॉकडाऊनदरम्यान जे लोक विनाकारण बाहेर फिरतील त्यांच्या दुचाकी गाड्या जप्त केल्या जातील. तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहे.

हे ही वाचा:

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी राज्यांनी लस खरेदी करावी

निर्मला सीतारामन यांचे ममता बॅनर्जींना प्रत्यत्तर

ठाकरे सरकार कोविडची आकडेवारी लपवतंय- प्रवीण दरेकर

न्यायालयाच्या हस्तक्षेपाची गरज नाही: केंद्र सरकार

शिवाय किराणा सामान, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, अंडी, मद्यालय, मद्य दुकाने आणि बार बंद राहणार आहे. तसेच किराणा आणि भाजीपाल्याची घरपोच सेवा सकाळी ७ ते ११ दरम्यान दिली जाईल. पण ग्राहकांना प्रत्यक्षात दुकानात जाऊन काहीही खरेदी करता येणार नाही.

त्याशिवाय शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, शिवभोजन थाळीची घरपोच सेवाही देता येणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, भाजी मंडई आणि आठवडी बाजारही बंद राहतील. पाळीव प्राण्यांच्या खाद्य पदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामाशी संबंधित असणाऱ्या साहित्यांच्या उत्पादनाशी निगडीत दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. पण त्यासाठी होम डिलिव्हरीची सेवा दिली जाणार आहे.

तसेच कृषी अवजारे आणि शेतातील उत्पादनाशी संबंधित दुकाने पूर्णपणे बंद राहतील. शेतकऱ्यांना आवश्यक त्या वस्तूंचा पुरवठा घरापर्यंत तसेच बांधापर्यंत करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत स्तरावर संबंधित कृषी सेवक, तालुका कृषी अधिकारी यांच्यावर देण्यात आली आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा