31 C
Mumbai
Monday, May 27, 2024
घरविशेषलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सरासरी ६४.२१% मतदान!

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सरासरी ६४.२१% मतदान!

त्रिपुरामध्ये सर्वाधिक तर बिहार, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी मतदान

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा दुसरा टप्पा आज पार पडला.१३ राज्यांतील लोकसभेच्या ८८ जागांसाठी मतदानाची वेळ संध्याकाळी ६ वाजता संपली.दरम्यान, देशभरात पार पडलेल्या मतदानाची आकडेवारी समोर आली आहे.सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्रिपुरामध्ये सर्वाधिक ७६.२३ टक्के मतदान झाले.महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी ५३% मतदान झाले आहे.

महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, नांदेड, हिंगोली आणि परभणी या आठ मतदारसंघात आज मतदान पार पडेल.राज्यातील या आठ मतदारसंघात सरासरी ५३.५१ टक्के मतदान झाले आहे.राज्यात आतापर्यंत सर्वाधिक मतदान हे वर्धा मतदारसंघात ५६.४९ टक्के तर सर्वात कमी हिंगोली लोकसभा मतदारसंघात ५२.०३ टक्के इतके मतदान झाले आहे.

 • राज्यातील ५ वाजेपर्यंतची आकडेवारी
  वर्धा – ५६.६६ टक्के
  अकोला -५२.४९ टक्के
  अमरावती – ५४.५० टक्के
  बुलढाणा – ५२.२४ टक्के
  हिंगोली – ५२.०३ टक्के
  नांदेड – ५२.४७ टक्के
  परभणी -५३.७९ टक्के
  यवतमाळ – वाशिम -५४.०४ टक्के

हे ही वाचा:

इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचा आंबा निर्यातीला फटका

स्वामी विवेकानंद शाळेने जिंकले विजेतेपद

सिसोदिया तुरुंगातच राहणार, न्यायालयीन कोठडीत वाढ!

उद्धव ठाकरे म्हणतात, यंदा ‘पंजा’ला मी करणार पहिल्यांदा मतदान

देशाचा विचार केला तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्रिपुरामध्ये सर्वाधिक ७६.२३ टक्के मतदान झाले.तर महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी ५३% मतदान झाले आहे.

 • १३ राज्यांची आकडेवारी :
  आसाम-७०.६६%
  बिहार-५३.०३%
  छत्तीसगढ-७२.१३%
  जम्मू-काश्मीर-६७.२२%
  कर्नाटक-६३.९०%
  केरळ-६३.९७%
  मध्यप्रदेश-५४.४२%
  महाराष्ट्र-५३.५१%
  मणिपूर-७६.०६%
  राजस्थान-५९.१९%
  त्रिपुरा-७६.२३%
  उत्तर प्रदेश-५२.६४%
  पश्चिम बंगाल-७१.८४
  सरासरी एकूण मतदान-६४.२१%
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
156,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा