31 C
Mumbai
Saturday, June 19, 2021
घर विशेष न्यायालयाच्या हस्तक्षेपाची गरज नाही: केंद्र सरकार

न्यायालयाच्या हस्तक्षेपाची गरज नाही: केंद्र सरकार

Related

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सरकारी यंत्रणांना धारेवर धरून कामाला लावणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाबद्दल केंद्र सरकारने नापसंती दर्शविली आहे. आमच्यावर विश्वास ठेवा, कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारने आखलेल्या धोरणात न्यायालयाच्या हस्तक्षेपाची गरज नाही, असे केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

देशातील कोरोना परिस्थितीच्या गैरव्यवस्थापनाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर रविवारी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने केंद्र सरकारला कोरोना लसीकरणाच्या धोरणाबाबत पुनर्विचार करण्याबाबत सुचविले. तेव्हा केंद्र सरकारने त्यास नकार देत सध्याचे लसीकरण धोरण परिपूर्ण असल्याचा दावा केला.

हे ही वाचा:

महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करणाऱ्यांवर आकसातून गुन्हा?

नरी कॉन्ट्रॅक्टर यांनाही लसीकरणाच्या अव्यवस्थेचा बसला फटका

युरेनियम चोरी प्रकरणात एनआयएची एन्ट्री

लसीकरण हा एकच उपाय,टाटा ग्रुपचं मत

कोरोनासारख्या गंभीर संकटाचा सामना करत असताना सरकारने आखलेल्या धोरणात माननीय न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची गरज नाही. व्यापक जनहिताचा विचार करता या धोरणात प्रशासनाला मोकळीक देण्यात आली आहे. कोरोना लसींचा मर्यादित साठा असताना हे धोरण सर्वांना समन्यायी पद्धतीने वाटप करणारे आहे. मुळात कोरोनाची समस्या ही अचानक उद्भवल्याने संपूर्ण देशातील नागरिकांना लस देणे शक्य नाही. त्यामुळे केंद्र सरकारने कोरोना लसीकरणासाठी सर्व बाबींची विचार करुन कोणावरही अन्याय होणार नाही आणि लसींचे समन्यायी पद्धतीने वाटप होईल, अशा पद्धतीने हे धोरण आखले आहे. त्यासाठी राज्य सरकार, तज्ज्ञ आणि लस उत्पादकांशी चर्चा करण्यात आली आहे, असे केंद्र सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा