भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर राहुल गांधी, शरद पवार, संजय राऊत काय म्हणाले?

भारताने नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक केला

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर राहुल गांधी, शरद पवार, संजय राऊत काय म्हणाले?

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले होते. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यामागील सूत्रधारांना शोधून कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले होते. अखेर भारताने पीओके आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उध्वस्त करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारताने नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक केला. भारताकडून करण्यात आलेल्या या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे. भारताच्या कारवाईवर आता देशभरातून विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी म्हटले ही की, “आपल्या लष्कराचा मला अभिमान आहे, जय हिंद!”. तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही यावर दोन शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. जय हिंद! असे संजय राऊतांनी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर म्हटले आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक्सवर प्रतिक्रिया देत सैन्याचे अभिनंदन केले आहे. “आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता, अतिरेक्यांच्या नऊ लक्ष्यांवर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला. भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणाऱ्या तसेच पहलगाम हल्ल्याचा योग्य प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे मनःपूर्वक अभिनंदन!”

हे ही वाचा:

“दहशतवाद्यांनी कुंकू पुसलेल्या महिलांचा पंतप्रधान मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’मधून केला आदर!”

“भारताने कोटली, मुझफ्फराबाद, बहावलपूरमध्ये हल्ला केला!” पाकने केलं मान्य

ऑपरेशन सिंदूर: वायव्य भारतातील विमानतळे काही काळासाठी बंद

भारताचे ऑपरेशन सिंदूर सुरू, पाकव्याप्त काश्मिरातील ९ ठिकाणी भारतीय लष्कराने केला हल्ला

Exit mobile version