29 C
Mumbai
Wednesday, August 26, 2026
घरस्पोर्ट्सकांस्यपदकानंतर वर्ल्ड रँकिंगमध्ये ‘सुपर’ झेप!

कांस्यपदकानंतर वर्ल्ड रँकिंगमध्ये ‘सुपर’ झेप!

Google News Follow

Related

बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या स्टार महिला दुहेरी जोडीला ताज्या जागतिक क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे. ३९व्या क्रमांकावर असलेली ही जोडी तब्बल १२ स्थानांची झेप घेत २७व्या क्रमांकावर पोहोचली आहे.

भारतामध्ये झालेल्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्रिशा-गायत्री जोडीने भारतासाठी एकमेव पदक जिंकले. उपांत्य फेरीत प्रवेश करत त्यांनी ऐतिहासिक कामगिरी केली. २०११ मध्ये ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी कांस्यपदक जिंकल्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळवणारी ही पहिली भारतीय महिला दुहेरी जोडी ठरली.

ताज्या क्रमवारीत त्रिशा-गायत्री यांच्या खात्यात ४४,१९२ गुण जमा झाले आहेत. यापूर्वी त्यांच्या नावावर ३३,६९२ गुण होते आणि त्या जागतिक क्रमवारीत ३९व्या स्थानावर होत्या.

चीनच्या चौथ्या मानांकित जोडीवर दमदार विजय

त्रिशा आणि गायत्री यांनी उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या चौथ्या मानांकित जिया यी फान आणि झांग शू जियान यांचा पराभव करत मोठा उलटफेर केला. पहिला गेम गमावल्यानंतर भारतीय जोडीने शानदार पुनरागमन करत सामना १६-२१, २१-१५, २१-१३ असा जिंकला.

या कामगिरीमुळे भारताने २०११ पासून वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये किमान एक पदक जिंकण्याची परंपरा कायम ठेवली.

पुरुष एकेरी क्रमवारीत मोठे बदल

दरम्यान, पुरुष एकेरीच्या टॉप-१० क्रमवारीतही मोठे बदल झाले आहेत. इंडोनेशियाचा जोनाथन क्रिस्टी नवा जागतिक क्रमांक-१ खेळाडू बनला आहे. राउंड ऑफ १६ मध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने तिसऱ्या क्रमांकावरून दोन स्थानांची झेप घेत अव्वल स्थान पटकावले.

मागील आठवड्यातील जागतिक क्रमांक-१ शी यूकी याला भारताच्या आयुष शेट्टीकडून पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागल्याने मोठा फटका बसला. तो आता पाच स्थानांनी घसरून सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

कुनलावुत वितिदसार्न दुसऱ्या, तर अँडर्स अँटोनसेन चौथ्या क्रमांकावर आहेत. क्रिस्टो पोपोव तीन स्थानांची झेप घेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर चोउ तिएन चेन दोन स्थानांनी वर येत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

नवा वर्ल्ड चॅम्पियन अॅलेक्स लॅनियर तीन स्थानांनी वर येत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताचा लक्ष्य सेन एका स्थानाने सुधारणा करत १३व्या, तर आयुष शेट्टी दोन स्थानांनी वर येत २०व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
329,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा