28.5 C
Mumbai
Monday, August 10, 2026
घरस्पोर्ट्सश्रीलंकेविरुद्ध झेलांमध्ये भारताचा दबदबा!

श्रीलंकेविरुद्ध झेलांमध्ये भारताचा दबदबा!

भारत श्रीलंका कसोटीतील सर्वाधिक झेल घेणारे खेळाडू

Google News Follow

Related

वॉर्मअप सामन्यात दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना १५ ऑगस्टपासून खेळवला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भारत-श्रीलंका कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंवर नजर टाकली, तर एका माजी भारतीय कर्णधाराचे नाव सर्वात वर दिसते.

१. मोहम्मद अजहरुद्दीन — २७ झेल

भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन हे भारत-श्रीलंका कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक झेल घेणारे खेळाडू आहेत. त्यांनी श्रीलंकेविरुद्ध खेळलेल्या १७ कसोटी सामन्यांत तब्बल २७ झेल टिपले आहेत. श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाचे कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीतही अजहरुद्दीन दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी ८ सामन्यांत टीम इंडियाचे नेतृत्व केले.

२. अजिंक्य रहाणे — २३ झेल

नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा अजिंक्य रहाणे या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या ९ कसोटी सामन्यांत रहाणेने २३ झेल घेतले आहेत. फलंदाजीतही श्रीलंका त्याच्यासाठी लकी ठरली असून, त्याने या संघाविरुद्ध ९ कसोटींमध्ये ४२४ धावा केल्या आहेत.

३. महेला जयवर्धने — २२ झेल

श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने हा भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक झेल घेणारा श्रीलंकन खेळाडू आहे. त्याने भारताविरुद्धच्या १८ कसोटी सामन्यांत २२ झेल घेतले आहेत. फलंदाजीतही त्याचा भारताविरुद्धचा विक्रम जबरदस्त आहे. जयवर्धनेने १८ सामन्यांत ६७च्या सरासरीने १,८२२ धावा केल्या आहेत.

४. राहुल द्रविड — १६ झेल

‘द वॉल’ म्हणून ओळखले जाणारे भारताचे माजी कर्णधार राहुल द्रविड या यादीत चौथ्या स्थानावर आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या २० कसोटी सामन्यांत द्रविडने १६ झेल घेतले आहेत. फलंदाज म्हणूनही श्रीलंकेच्या भूमीवर द्रविडची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे.

५. हसन तिलकरत्ने — १५ झेल

श्रीलंकेचे माजी फलंदाज हसन तिलकरत्ने या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत. भारताविरुद्ध खेळलेल्या १४ कसोटी सामन्यांत त्यांनी १५ झेल घेतले आहेत.

या यादीत भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे १३ झेलांसह सहाव्या, तर केएल राहुल १२ झेलांसह सातव्या क्रमांकावर आहे.

भारत-श्रीलंका कसोटी मालिकेला आता अवघे काही दिवस शिल्लक असताना, या आकडेवारीत आणखी भर पडते का, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
327,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा