28.7 C
Mumbai
Friday, October 30, 2026
घरस्पोर्ट्सजेमिमा मैदानात पुनरागमनासाठी सज्ज!

जेमिमा मैदानात पुनरागमनासाठी सज्ज!

Google News Follow

भारतीय महिला क्रिकेट संघाची आघाडीची फलंदाज जेमिमा रोड्रिग्स हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरली आहे. तब्बल तीन महिने मैदानापासून दूर राहिल्यानंतर आता ती पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून ती भारतीय संघात परतण्याची शक्यता आहे.

जेमिमाने शुक्रवारी इन्स्टाग्रामवरून आपल्या फिटनेसबाबत माहिती दिली. ‘हॅमस्ट्रिंग आता पूर्णपणे ठीक आहे. तीन महिन्यांच्या पुनर्वसनानंतर पुन्हा मैदानावर उतरण्यासाठी मी उत्सुक आहे,’ असे तिने म्हटले आहे.

यंदा इंग्लंडमध्ये झालेल्या ‘द हंड्रेड’ स्पर्धेदरम्यान सदर्न ब्रेव्हकडून खेळताना वेल्श फायरविरुद्धच्या सामन्यात तिच्या उजव्या पायाच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली होती. वैद्यकीय तपासणीत ही गंभीर स्वरूपाची दुखापत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे तिला महिला टी-२० आशिया कप, आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ तसेच झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेला मुकावे लागले.

आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यापूर्वी जेमिमा मुंबईकडून वरिष्ठ महिला टी-२० ट्रॉफीमध्ये खेळण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात ९ डिसेंबरपासून कसोटी सामन्याने होणार असून, त्यानंतर तीन वनडे आणि तीन टी-२० सामने खेळवले जाणार आहेत.

विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच दिवशी जेमिमाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला वनडे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत नाबाद १२७ धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. तिच्या या खेळीच्या जोरावर भारताने ३३९ धावांचे आव्हान पार करत अंतिम फेरी गाठली आणि पुढे विश्वविजेतेपदही पटकावले. दुखापतीवर मात करून आता ती पुन्हा एकदा भारतीय संघासाठी मैदानात उतरण्यास उत्सुक आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा