दोन दशकांनंतर इंग्लंड-अर्जेंटिना आमनेसामने

दोन दशकांनंतर इंग्लंड-अर्जेंटिना आमनेसामने

तब्बल दोन दशकांनंतर इंग्लंड आणि अर्जेंटिना हे पारंपरिक प्रतिस्पर्धी फिफा विश्वचषकाच्या मैदानावर आमनेसामने येणार आहेत. गुरुवारी, १६ जुलै रोजी फिफा विश्वचषक २०२६च्या उपांत्य फेरीत दोन्ही संघांमध्ये अंतिम फेरीचे तिकीट मिळवण्यासाठी महामुकाबला रंगणार आहे. फुटबॉल विश्वातील सर्वांत जुन्या आणि प्रतिष्ठेच्या प्रतिस्पर्ध्यांपैकी ही एक लढत मानली जाते.

विश्वचषकात इंग्लंड आणि अर्जेंटिना आतापर्यंत पाच वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये इंग्लंडचे पारडे जड राहिले असून, त्यांनी तीन सामने जिंकले आहेत. अर्जेंटिनाने दोन सामन्यांत विजय मिळवला असून, त्यापैकी एका लढतीचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लागला होता.

दोन्ही संघांची विश्वचषकातील पहिली गाठ १९६२मध्ये पडली होती. त्या वेळी साखळी फेरीत इंग्लंडने अर्जेंटिनाचा ३-१ असा पराभव केला होता. त्यानंतर १९६६च्या विश्वचषकातील उपांत्यपूर्व फेरीत वेम्बलीच्या मैदानावर झालेल्या सामन्याने या कट्टर प्रतिस्पर्ध्यांच्या संघर्षाला नवी धार दिली. इंग्लंडने तो सामना १-० असा जिंकला. मात्र, ज्योफ हर्स्टच्या निर्णायक गोलपेक्षा अर्जेंटिनाचा कर्णधार अँटोनियो रॅटिन याला मैदानाबाहेर पाठवण्याच्या निर्णयामुळे हा सामना अधिक चर्चेत राहिला.

त्या विश्वचषकात इंग्लंडने विजेतेपदाची ट्रॉफी उंचावली. मात्र, इंग्लंड-अर्जेंटिना सामन्यातील कटुता अनेक दशके कायम राहिली. आता तब्बल २० वर्षांनंतर मेक्सिको सिटीतील ऐतिहासिक अझ्टेका स्टेडियमवर हे दोन संघ पुन्हा एकदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील स्थानासाठी भिडणार आहेत.

हेही वाचा :

जगन्नाथ रथयात्रेपूर्वी मोठा कट उधळला; ५ दहशतवादी अटकेत

विनयभंग केल्याचा जाब विचारला म्हणून कुटुंबाचा २० किलोमीटर पाठलाग, गाडीही फोडली

उंबरविहीरची तहान भागली; २४९ कुटुंबांना वर्षभर शुद्ध पाणी

हॉर्मुझ सामुद्रधुनीत दोन तेलवाहू टँकर्सवर हल्ला; एका भारतीय खलाशाचा मृत्यू

दरम्यान, स्वित्झर्लंडचा पराभव करत अर्जेंटिनाने फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या विजयासह अर्जेंटिनाचे प्रशिक्षक लियोनेल स्कालोनी यांनी आणखी एका विक्रमाला गवसणी घालत राष्ट्रीय संघाच्या इतिहासातील सर्वांत महत्त्वाच्या प्रशिक्षकांमध्ये आपले स्थान अधिक भक्कम केले आहे.

स्वित्झर्लंडविरुद्धचा सामना हा स्कालोनी यांचा अर्जेंटिनाच्या प्रशिक्षकपदावरील १३वा विश्वचषक सामना होता. यासह त्यांनी १९७८च्या विश्वविजेत्या अर्जेंटिना संघाचे प्रशिक्षक सीझर लुईस मेनोटी यांचा १२ विश्वचषक सामन्यांचा विक्रम मागे टाकला.

आता स्कालोनी यांच्या नजरा कार्लोस साल्वाडोर बिलार्डो यांच्या विक्रमावर आहेत. बिलार्डो यांनी १४ विश्वचषक सामन्यांत अर्जेंटिना संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. या यादीत स्कालोनी आता दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत.

Exit mobile version