31 C
Mumbai
Wednesday, April 8, 2026
घरस्पोर्ट्स‘सिंगल कशाला? मी तर षटकारच मारणार!

‘सिंगल कशाला? मी तर षटकारच मारणार!

Google News Follow

Related

बिहारचा १५ वर्षीय युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. पण त्याचा हा आक्रमक स्वभाव आजचा नाही… तर लहानपणापासूनच त्याच्या खेळात दिसून येतो.

वैभवचे बालपणीचे प्रशिक्षक मनीष ओझा यांनी सांगितलं की, २०१८ साली वैभव पहिल्यांदा अकॅडमीत आला तेव्हाच त्याच्यातील टॅलेंट आणि क्रिकेटसाठीचं वेड स्पष्ट दिसत होतं. तो प्रत्येक सेशनमध्ये ४०० ते ५०० चेंडू खेळायचा आणि ब्रेक सांगितल्याशिवाय थांबतच नसे.

पण त्याची खासियत म्हणजे त्याचा आक्रमक खेळ. २०२२ मध्ये नेट सेशनदरम्यान त्याला संयमाने खेळण्याचा सल्ला देण्यात आला. मोठे शॉट्स कमी खेळून सिंगल-डबल्स घ्यायला सांगितलं. पण त्यावर वैभवचं उत्तर थेट आणि धाडसी होतं – “सर, जर मी त्या चेंडूवर षटकार मारू शकतो, तर सिंगल का घेऊ?”

आयपीएल ट्रायल्समध्येही वैभवने आपली ताकद दाखवली. पहिल्याच ओव्हरमध्ये १८ धावांचं टार्गेट त्याने फक्त ३ चेंडूत पूर्ण केलं. दुसऱ्या ट्रायलमध्ये २४ धावा करण्याचं आव्हान त्याने ५ चेंडूत पूर्ण केलं. त्यामुळेच राजस्थान रॉयल्सच्या नजरा त्याच्यावर खिळल्या.

अंडर-१९ वर्ल्ड कपमध्येही वैभवने चमकदार सुरुवात केली, पण अनेक वेळा ५०-७० धावांवर बाद होत होता. मात्र, प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनानंतर त्याने अंतिम सामन्यात शतक झळकावत स्वतःला सिद्ध केलं.

गेल्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने ७ सामन्यांत २५२ धावा केल्या, ज्यात १ शतक आणि १ अर्धशतकाचा समावेश होता.

ब्रायन लारा आणि युवराज सिंग हे त्याचे आदर्श खेळाडू आहेत. त्यांच्या प्रमाणे एकहाती सामना जिंकण्याचं स्वप्न पाहणारा वैभव आता आयपीएल २०२६ मध्ये मोठा ठसा उमटवण्यासाठी तयार आहे.

आता पाहायचं इतकंच… हा “षटकारवेडा” तरुण यंदाच्या आयपीएलमध्ये किती मोठा धमाका करतो!

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
302,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा