31 C
Mumbai
Saturday, November 21, 2026
घरस्पोर्ट्सभारत-अचा विक्रमी प्रहार, नेपाळचा ३०६ धावांनी पराभव!

भारत-अचा विक्रमी प्रहार, नेपाळचा ३०६ धावांनी पराभव!

Google News Follow

एसीसी पुरुष आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ स्पर्धेत भारत-अ संघाने ऐतिहासिक कामगिरी करत नेपाळचा तब्बल ३०६ धावांनी धुव्वा उडवला. भारत-अ संघाने दिलेल्या ३३३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळचा संपूर्ण संघ अवघ्या २६ धावांत गारद झाला. या विजयासह भारत-अ संघाने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये धावांच्या फरकाने सर्वात मोठा विजय नोंदवण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.

यापूर्वी हा विक्रम इंग्लंडमधील लीसेस्टरशायर संघाच्या नावावर होता. २०१८ मध्ये त्यांनी २८१ धावांनी विजय मिळवला होता. भारत-अ संघाने हा विक्रम मोडीत काढत नवा इतिहास घडवला. नेपाळचे पाच फलंदाज खातेही उघडू शकले नाहीत. एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. प्रिन्स यादव आणि हर्षित राणा यांच्या भेदक गोलंदाजीसमोर नेपाळचे फलंदाज निष्प्रभ ठरले. नेपाळने लिस्ट-ए क्रिकेटमधील चौथ्या नीचांकी धावसंख्येची नोंद केली.

तत्पूर्वी, भारत-अ संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद ३३२ धावा उभारल्या. कर्णधार तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्र यांनी शानदार शतके झळकावली. तिलकने ११३ चेंडूंत ६ चौकार आणि ४ षटकारांसह १०७ धावा केल्या. तर कुशाग्रने १०२ चेंडूंत १० चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ११७ धावांची खेळी साकारली.

भारताची सुरुवात मात्र खराब झाली होती. अवघ्या ४२ धावांवर संघाने तीन महत्त्वाचे फलंदाज गमावले होते. त्यानंतर तिलक आणि कुशाग्र यांनी चौथ्या विकेटसाठी २०६ धावांची भागीदारी करत डाव सावरला. अखेरच्या षटकांत सूर्यांश शेडगेने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या १४ चेंडूंत नाबाद ३६ धावा ठोकल्या. त्याच्या खेळीत १ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. वैभव सूर्यवंशीनेही २६ धावांचे योगदान दिले. या सांघिक कामगिरीच्या जोरावर भारत-अ संघाने नेपाळवर ऐतिहासिक विजय मिळवला.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा