भारतीय क्रिकेट संघाने ग्रुप ए मध्ये अव्वल स्थान मिळवत टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ फेरीत प्रवेश केला आहे. सुपर-८ मध्ये भारत कोणत्या संघांविरुद्ध आणि केव्हा खेळणार याचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. भारताच्या दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांच्याशी या लढती होणार आहेत.
या तीन संघांविरुद्ध भारताची कामगिरी
१) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
२२ फेब्रुवारी
नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
सायंकाळी ७ वाजता
सुपर-८ मधील भारताचा हा पहिला आणि सर्वात कठीण सामना मानला जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून ग्रुप डी मध्ये अव्वल स्थानावर राहून सुपर-८ मध्ये पोहोचला आहे. त्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका सामना अत्यंत चुरशीचा होणार हे निश्चित आहे.
टी-२० सामन्यांतील परस्पर विक्रम:
एकूण सामने: ३५
भारताचे विजय: २१
दक्षिण आफ्रिकेचे विजय: १३
१ सामना अनिर्णित
आकडेवारीनुसार भारत आघाडीवर असला तरी सध्याच्या फॉर्ममुळे हा सामना संघर्षपूर्ण ठरू शकतो. मागील टी-२० विश्वचषकात भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवूनच विजेतेपद पटकावले होते.
हे ही वाचा:
एआय समिटमधून चोरीला गेलेले स्टार्टअप डिव्हाइस २४ तासांत सापडले
पाकिस्तानसाठी रावी नदीचे पाणी बंद!
स्वीडनपासून स्पेनपर्यंतचे जागतिक नेते एआय इम्पॅक्ट समिटसाठी भारतात
“फ्रान्स हा भारताचा सर्वात जुना धोरणात्मक भागीदार”
भारत विरुद्ध झिम्बाब्वे
२६ फेब्रुवारी
एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
सायंकाळी ७ वाजता
सुपर-८ मधील भारताचा दुसरा सामना झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. झिम्बाब्वेने या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली असून ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघालाही पराभूत केले आहे. त्यामुळे हा सामना हलक्यात घेणे भारतासाठी धोकादायक ठरू शकते.
टी-२० सामन्यांतील परस्पर विक्रम:
एकूण सामने: १३
भारताचे विजय: १०
झिम्बाब्वेचे विजय: ३
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
१ मार्च
इडन गार्डन, कोलकाता
सायंकाळी ७ वाजता
सुपर-८ मधील भारताचा तिसरा सामना दोन वेळा विश्वविजेता राहिलेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध आहे. वेस्ट इंडिजने या विश्वचषकात उत्कृष्ट फलंदाजी आणि प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर ग्रुप डी मध्ये अव्वल स्थान पटकावून सुपर-८ मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे हा सामना देखील भारतासाठी सोपा नसणार आहे.
टी-२० सामन्यांतील परस्पर विक्रम:
एकूण सामने: ३०
भारताचे विजय: १९
वेस्ट इंडिजचे विजय: १०
१ सामना अनिर्णित







