श्रीकांत दुसऱ्या फेरीतच बाद; इंडिया ओपनमध्ये भारतीयांना धक्का

श्रीकांत दुसऱ्या फेरीतच बाद; इंडिया ओपनमध्ये भारतीयांना धक्का

इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत गुरुवारी भारतीय चाहत्यांना निराशा पाहायला मिळाली. माजी विजेता किदांबी श्रीकांत दुसऱ्या फेरीतच पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडला. फ्रान्सच्या क्रिस्टो पोपोव याने श्रीकांतवर १४–२१, २१–१७, १७–२१ असा विजय मिळवला.

पहिला डाव हातचा गेल्यानंतर श्रीकांतने दुसऱ्या डावात जोरदार खेळ करत सामना तिसऱ्या डावात नेला. मात्र निर्णायक टप्प्यात पोपोव अधिक स्थिर ठरला आणि सामना जिंकला. या दोघांतील ही तिसरी लढत होती, आणि पहिल्यांदाच श्रीकांतला पोपोवकडून हार पत्करावी लागली.

महिला एकेरीतही भारताला धक्का बसला. मालविका बंसोड हिला चीनच्या हान यू कडून सरळ डावांत १८–२१, १५–२१ अशी हार स्वीकारावी लागली. यासह महिला एकेरीतील भारताचं आव्हान संपलं.

याआधी पी. व्ही. सिंधू पहिल्याच फेरीत बाहेर पडली होती. पुरुष एकेरीत मात्र एच. एस. प्रणॉय याने विजय मिळवत पुढची फेरी गाठली आहे. दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला वॉकओव्हर मिळाल्याने ते पुढे गेले.

Exit mobile version