26 C
Mumbai
Wednesday, February 18, 2026
घरस्पोर्ट्सभारताचा १०१ टक्के विजय; पंड्याचा दणका

भारताचा १०१ टक्के विजय; पंड्याचा दणका

भारताने घेतली १-० आघाडी

Google News Follow

Related

टी 20 वर्ल्ड कप २०२६ च्या तयारीला सुरुवात करताना भारताने कटकच्या बाराबती स्टेडियमवर झालेल्या पहिल्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेला तब्बल १०१ धावांनी पराभूत करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या विजयात हार्दिक पंड्याची अष्टपैलू कामगिरी आणि गोलंदाजांचा शिस्तबद्ध मारा प्रभावी ठरला.

भारताने केलेल्या १७६ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवातच डळमळीत झाली. अर्शदीप सिंगने दुसऱ्या चेंडूवर क्विंटन डी कॉकला शून्यावर बाद केले.

पुढच्या ओव्हरमध्ये त्याने ट्रिस्टन स्टब्सला तंबूचा रस्ता दाखवला. मार्कराम आणि ब्रेव्हिसने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण पॉवरप्लेमध्ये आलेल्या अक्षर पटेलने मार्करामला १४ धावांवर त्रिफळाचीत केले.

इजा झाल्यानंतर राष्ट्रीय संघात पुनरागमन करणाऱ्या हार्दिक पंड्याने पहिल्याच चेंडूवर डेव्हिड मिलरला बाद करत दबाव अधिक वाढवला. मारको जान्सनने दोन षटकार मारत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण वरुण चक्रवर्तीने त्याला बाद केले.

जसप्रीत बुमराहने ब्रेव्हिसला बाद करत टी 20 मधील १०० विकेट्स पूर्ण केल्या. त्यानंतर केशव महाराजलाही त्यांनी पॅव्हिलियनमध्ये धाडले. अक्षरने नॉर्टजेची विकेट घेतली, तर शिवम दुबेने सिपामलाला बाद करत दक्षिण आफ्रिकेला फक्त १२.३ षटकांत ७४ धावांत गुंडाळले. दक्षिण आफ्रिकेचा  टी 20 इतिहासातील ही सर्वात कमी धावसंख्या ठरली.

 हार्दिक पंड्याचे वर्चस्व

त्याआधी, भारताने फलंदाजी करताना चढउतार अनुभवले. लुंगी एन्गिडीने शुभमन गिलला बाद करून भारताला पहिला धक्का दिला. त्यानेच सूर्यकुमार यादवलाही बाद केले.

अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांनी ६ षटकांत भारताला २ बाद ४० वर नेले, पण अभिषेक बाद झाल्यावर भारतीय संघाची लय पुन्हा बिघडली.

तिलक आणि अक्षरने मधल्या षटकांत धावा करण्याचा प्रयत्न केला पण ते फारसे यशस्वी ठरले नाहीत. तिलकचा २६ धावांचा संयमी खेळ संपल्यावर भारताला गतीची गरज होती. ती जबाबदारी हार्दिक पांड्याने शानदारपणे पार पाडली.

हे ही वाचा:

मायक्रोसॉफ्ट भारतात १.५ लाख कोटी रुपये गुंतवणार

पाच दिवसात ‘धुरंधर’ने कमावले १५० कोटी

बडतर्फ शिपाई आलोक सिंह, अमित सिंह टाटाला न्यायालयीन कोठडी

नड्डा शिमलामध्ये पक्ष कार्यालयाची पायाभरणी करणार

हार्दिकची अविस्मरणीय खेळी

हर्डीकने ६ चौकार आणि ४ खणखणीत षटकारांसह २८ चेंडूत ५९ धावा केल्या. संथ आणि फिरकीला मदत करणाऱ्या विकेटवर त्याने फटकेबाजी केली.

त्याच्या या तडाखेबंद खेळीमुळे भारताला ६ बाद १७५ पर्यंत झेप घेता आली. शिवम दुबे आणि जितेश शर्माने शेवटी काही महत्त्वाच्या धावा जोडल्या.

पुढील सामना

१-० आघाडी घेतल्यानंतर आता दोन्ही संघ न्यू चंदीगड येथे महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारी होणाऱ्या दुसऱ्या टी 20 सामन्यासाठी रवाना होतील.

संक्षिप्त धावफलक

भारत – १७५/६ (२० षटके) हार्दिक पंड्या नाबाद ५९, तिलक वर्मा : २६,  लुंगी एन्गिडी : ३/३१, लुथो सिपामला : २/३८ वि. दक्षिण आफ्रिका – सर्वबाद ७४  (१२.३ षटके) ब्रेव्हिस : २२, स्टब्स : १४, अक्षर पटेल : २/७, अर्शदीप सिंग : २/१४

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
292,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा