केएल राहुल वनडेसाठी कर्णधार, जडेजा–ऋतुराजचे पुनरागमन

दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

केएल राहुल वनडेसाठी कर्णधार, जडेजा–ऋतुराजचे पुनरागमन

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यीय संघ निवडण्यात आला आहे.

नियमित कर्णधार शुभमन गिलच्या मानेला झालेल्या दुखापतीमुळे तो या वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे. उपकर्णधार श्रेयस अय्यरही ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे आधीपासूनच संघाबाहेर आहे. त्यामुळे कर्णधार आणि उपकर्णधार यांच्या अनुपस्थितीत केएल राहुल याच्यावर वनडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली संघात समाविष्ट आहेत. सलामीवीर म्हणून यशस्वी जायसवाल आणि ऋतुराज गायकवाड यांचा समावेश करण्यात आला आहे. गायकवाडचे दोन वर्षांनंतर वनडे संघात पुनरागमन झाले आहे. अलीकडेच दक्षिण आफ्रिका ‘ए’ संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत गायकवाडने उत्कृष्ट कामगिरी केली होती आणि ‘प्लेयर ऑफ द सीरीज’ ठरला होता.

हे ही वाचा:

पंकजा मुंडेंचा स्वीय सहाय्यक अनंत गर्जेच्या पत्नीची आत्महत्या, प्रेयसीवरून झाला वाद

स्मृती मंधानाचा विवाह सोहळा स्थगित, वडिलांची तब्येत बिघडली

कढीपत्ता : आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी वरदान

जपानच्या पंतप्रधान ताकाइची यांच्या विरोधात आंदोलन तीव्र

संघात राहुल व्यतिरिक्त ऋषभ पंत यष्टीरक्षक असेल, तर ध्रुव जुरेलला फलंदाज म्हणून स्थान देण्यात आले आहे. रवींद्र जडेजाचेही संघात पुनरागमन झाले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत त्यांना विश्रांती देण्यात आली होती. वाशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा आणि अर्शदीप सिंग यांचा संघात समावेश आहे.

जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे, तर अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांना संघात स्थान मिळाले नाही. हार्दिक पांड्या दुखापतीतून सावरू न शकल्याने या मालिकेसाठी उपलब्ध नाहीत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला वनडे ३० नोव्हेंबर रोजी रांची येथे, दुसरा वनडे ३ डिसेंबर रोजी रायपूर येथे आणि तिसरा वनडे ६ डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे.

भारतीय संघ :
रोहित शर्मा, यशस्वी जायसवाल, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार व यष्टीरक्षक), ऋषभ पंत (विकेटकीपर), वाशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल।

Exit mobile version