28.1 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरस्पोर्ट्सकुलदीप यादवचा ऐतिहासिक विक्रम

कुलदीप यादवचा ऐतिहासिक विक्रम

२०० वनडे विकेट्सचा टप्पा गाठला

Google News Follow

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादवने वनडे क्रिकेटमध्ये मोठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात कुलदीपने दोन विकेट्स घेत २०० वनडे विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. या कामगिरीसह तो वनडे क्रिकेटमध्ये २०० बळी घेणारा भारताचा नववा गोलंदाज आणि हा पराक्रम करणारा चौथा भारतीय फिरकीपटू ठरला आहे. सामन्यापूर्वी कुलदीपच्या खात्यात १२२ सामन्यांत १९८ विकेट्स होत्या. त्यामुळे या सामन्यात त्याला ऐतिहासिक क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी केवळ दोन विकेट्सची गरज होती.

कुलदीपने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेतही प्रभावी गोलंदाजी केली होती. तिरुवनंतपुरम येथे झालेल्या त्या सामन्यात त्याने चार विकेट्स घेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कारही मिळाला होता. त्यामुळे दुसऱ्या वनडेत मैदानात उतरताना त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. या सामन्यात दोन विकेट्स घेत त्याने त्या अपेक्षांना साजेसा खेळ करत आपल्या वनडे कारकिर्दीत आणखी एक महत्त्वाचा अध्याय जोडला आहे.

२०० वनडे विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत कुलदीप यादवने आता दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. भारताकडून सर्वाधिक वनडे विकेट्स घेण्याचा विक्रम अनिल कुंबळे यांच्या नावावर आहे. कुंबळे यांनी २६९ वनडेत ३३४ विकेट्स घेतल्या आहेत. त्यांच्यानंतर हरभजन सिंह यांनी २६५, तर रवींद्र जडेजाने २३२ विकेट्स घेतल्या आहेत. कुलदीप हा २०० किंवा त्यापेक्षा अधिक वनडे विकेट्स घेणारा चौथा भारतीय फिरकीपटू ठरला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा