‘द वॉल’वरून स्टीव्ह स्मिथची अखेर झेप!

‘द वॉल’वरून स्टीव्ह स्मिथची अखेर झेप!

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना शुक्रवारपासून मेलबर्न येथे सुरू झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव स्मिथ याने पुनरागमन केले. मात्र फलंदाजीमध्ये त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे ठरली नाही. पहिल्या डावात स्मिथला अवघ्या ९ धावा करता आल्या, पण क्षेत्ररक्षणात त्याने इतिहास रचला.

इंग्लंडच्या पहिल्या डावात स्मिथने २ झेल टिपले आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल पकडणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांना मागे टाकले. स्मिथच्या नावावर आता कसोटी क्रिकेटमध्ये एकूण २१२ झेल झाले आहेत. राहुल द्रविड़ यांनी आपल्या कारकिर्दीत २१० झेल पकडले होते. या यादीत स्मिथच्या पुढे आता फक्त जो रुट असून त्याच्या नावावर २१४ झेल आहेत.

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या दिवशी गोलंदाजांचेच वर्चस्व पाहायला मिळाले. नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या १५२ धावांवर संपुष्टात आला.

ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने १२, जेक वेदराल्डने १०, उस्मान ख्वाजाने २९, अ‍ॅलेक्स कॅरीने २० आणि कॅमरन ग्रीनने १७ धावा केल्या. स्टीव्ह स्मिथचेही अपयश झाले आणि तो ९ धावांवर बाद झाला. मायकेल नेसरने सर्वाधिक ३५ धावांची झुंजार खेळी केली.

इंग्लंडकडून जोश टंग सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ५ विकेट्स घेतल्या. गस अ‍ॅटकिंसनने २ विकेट्स, तर कर्णधार बेन स्टोक्स आणि ब्रायडन कार्स यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

मात्र प्रत्युत्तरात इंग्लंडची फलंदाजीही ढासळली. मोठी आघाडी घेण्याची संधी असतानाही इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या ११० धावांवर बाद झाला. हॅरी ब्रूकने ४१ धावा करत सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. गस अ‍ॅटकिंसनने २८, तर कर्णधार बेन स्टोक्सने १६ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाकडून मायकेल नेसरने ४, स्कॉट बोलँडने ३ आणि मिचेल स्टार्कने २ विकेट्स घेतल्या. कॅमरन ग्रीनला १ विकेट मिळाली.

Exit mobile version