27 C
Mumbai
Saturday, February 14, 2026
घरस्पोर्ट्सनेदरलँड्ने पाकड्यांना घाम फोडला!

नेदरलँड्ने पाकड्यांना घाम फोडला!

Google News Follow

Related

टी२० वर्ल्ड कप २०२६ मधील आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सवर ३ विकेट्सने रोमांचक विजय मिळवत स्पर्धेला दमदार सुरुवात केली. हा सामना शनिवारी सिंहली स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळवण्यात आला.

टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजीस उतरलेल्या नेदरलँड्सचा डाव १९.५ षटकांत १४७ धावांवर आटोपला. सलामीवीरांनी संघाला वेगवान सुरुवात करून दिली. मायकेल लेविट आणि मॅक्स ओ’डॉउड यांनी ३.१ षटकांत २८ धावांची भागीदारी केली.

ओ’डॉउड ७ चेंडूत ५ धावा करून बाद झाला, तर लेविटने १५ चेंडूत १ षटकार आणि ३ चौकारांसह २४ धावांची खेळी केली. ३१ धावांवरच दोन्ही सलामीवीर गमावल्यानंतर संघ अडचणीत सापडला.

यानंतर बास डी लीडे आणि कॉलिन एकरमन यांनी तिसऱ्या विकेटसाठी २२ चेंडूत ३४ धावा जोडत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. एकरमन २० धावांवर बाद झाला. त्यानंतर डी लीडेने कर्णधार स्कॉट एडवर्ड्ससोबत चौथ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी करत संघाला १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला.

नेदरलँड्सकडून कर्णधार एडवर्ड्सने २९ चेंडूत ४ चौकारांसह सर्वाधिक ३७ धावा केल्या, तर बास डी लीडेने ३० धावांचे योगदान दिले. पाकिस्तानकडून सलमान मिर्झाने सर्वाधिक ३ बळी घेतले. मोहम्मद नवाझ, अबरार अहमद आणि सईम अयूब यांनी प्रत्येकी २ बळी घेतले, तर शाहीन आफ्रिदीने १ बळी टिपला.

१४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवातही डळमळीत झाली. २७ धावांवर सईम अयूब १३ चेंडूत २४ धावा करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार सलमान आगा १२ धावांवर माघारी परतला. ५३ धावांवर २ विकेट्स गमावल्यानंतर पाकिस्तान अडचणीत दिसत होता.

यानंतर साहिबजादा फरहान आणि बाबर आझम यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३८ चेंडूत ४५ धावांची भागीदारी करत संघाला ९८ धावांपर्यंत नेले. फरहानने ३१ चेंडूत २ षटकार आणि ४ चौकारांसह ४७ धावांची दमदार खेळी केली. मात्र त्याच्या बाद झाल्यानंतर पाकिस्तानच्या डावाला अचानक खीळ बसली आणि ११४ धावांपर्यंत सात विकेट्स गमावल्या.

शेवटी फहीम अशरफ (नाबाद २९) आणि शाहीन आफ्रिदी (नाबाद ५) यांनी २० चेंडूत ३४ धावांची भागीदारी करत सामना अखेरच्या षटकात पाकिस्तानच्या बाजूने फिरवला. पाकिस्तानला शेवटच्या २ षटकांत २९ धावांची गरज होती. १८.२ षटकात फहीम अशरफला जीवनदान मिळाले आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत त्याने संघाला थरारक विजय मिळवून दिला.

नेदरलँड्सकडून आर्यन दत्त आणि पॉल वॅन मीकेरेन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. लोगन वॅन बीक, काइल क्लेन आणि रोएलोफ वॅन डेर मेरवे यांनी प्रत्येकी १ बळी मिळवला.

या विजयासह पाकिस्तानने टी२० वर्ल्ड कपमधील आपला प्रवास विजयी पावलांनी सुरू केला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा