भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात रोहित शर्माने आणखी एक ऐतिहासिक विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. भारत–न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम मोडला.
वडोदऱ्यातील कोटांबी स्टेडियमवर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत ८ बाद ३०० धावा केल्या आणि भारतासमोर ३०१ धावांचे लक्ष्य ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी केली. रोहित शर्माने डावाची आक्रमक सुरुवात करत दोन षटकार ठोकले आणि याच षटकारांसह त्यांनी विश्वविक्रमाची नोंद केली.
हे ही वाचा:
महायुतीच्या काळात नाशिकमध्ये ५७ हजार कोटींची गुंतवणूक
सबरीमला सोन्याच्या चोरीवर अमित शहांचा हल्लाबोल
इंडियन आयडल विजेता प्रशांत तमांग यांचे ४३व्या वर्षी निधन
अजित डोभाल यांच्या भेटीत ऑल इंडिया सूफी सज्जादानशीन कौन्सिलच्या भेटीत काय ठरले ?
या सामन्यापूर्वी वनडे क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकारांचा विक्रम वेस्ट इंडिजच्या क्रिस गेल यांच्या नावावर होता. गेल यांनी ३२८ षटकार मारले होते. मात्र, रोहित शर्माने आपला ३२९ वा षटकार लगावत हा विक्रम मोडला. विशेष म्हणजे रोहितने केवळ १९३ एकदिवसीय सामन्यांत ही कामगिरी साध्य केली आहे.
या सामन्यात रोहित शर्मा २६ धावा करून बाद झाले. कोणत्याही फलंदाजी क्रमांकावर खेळताना वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज म्हणूनही रोहित आधीच अव्वल स्थानी आहेत. त्यांच्या नावावर आता एकूण ३५७ षटकारांची नोंद आहे.
