“श्रेयस अय्यरची प्रकृती आता…” सूर्यकुमार यादवने काय सांगितले?

सूर्यकुमार यादव याने श्रेयस अय्यरच्या प्रकृतीबद्दल दिले नवीन अपडेट

“श्रेयस अय्यरची प्रकृती आता…” सूर्यकुमार यादवने काय सांगितले?

ऑस्ट्रेलियामधील सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या गंभीर दुखापतीनंतर भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरची प्रकृती आता स्थिर असून तो धोक्याबाहेर असल्याचे समोर आले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टी- २० सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादव याने यासंबंधी भाष्य केले आहे. मंगळवार, २८ ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत बोलताना, भारताचा टी- २० कर्णधार सूर्यकुमार यादव याने श्रेयस अय्यरबद्दल नवीन अपडेट दिले. यामुळे क्रिकेट चाहत्यांनी काहीसा निःश्वास सोडला आहे.

सूर्यकुमार यादवला श्रेयस अय्यरच्या प्रकृतीबद्दल विचारण्यात आले. तेव्हा कर्णधाराने सांगितले की, श्रेयसची प्रकृती स्थिर आहे. सध्या तो त्याला पाठवत असलेल्या मेसेजेसना उत्तर देत आहे. सूर्याने सांगितले की अय्यरला आणखी काही दिवस निरीक्षणाखाली ठेवण्याची शक्यता आहे, परंतु सध्या तो धोक्याबाहेर आहे.

“पहिल्या दिवशी, जेव्हा मला कळले की तो जखमी आहे, तेव्हा मी त्याला फोन केला. मला कळले की त्याच्याकडे त्याचा फोन नाही. म्हणून, मी फिजिओला फोन केला आणि त्यांनी मला सांगितले की श्रेयसची प्रकृती स्थिर आहे. पण मी गेल्या दोन दिवसांपासून त्याच्याशी बोलत असून तो फोनवर उत्तर देत आहे. जर तो उत्तर देत असेल याचा अर्थ असा की तो स्थिर आहे. तो बरा दिसत आहे, डॉक्टर त्याच्यासोबत आहेत. पण पुढील काही दिवस तो देखरेखीखाली असेल. पण तो उत्तर देत आहे, म्हणून ते चांगले आहे, असे सूर्यकुमार यादव याने स्पष्ट केले.

हे ही वाचा : 

अवघ्या ११ महिन्यात विवाहितेचा मृत्यू; स्लो पॉइजन देऊन हत्या केल्याचा आरोप

हाफिज सईदचा निकटवर्ती झहीर बांगलादेश दौऱ्यावर; सीमावर्ती जिल्ह्यांना दिल्या भेटी

“महागठबंधन सुधारणा करू शकते पण वक्फ कायदा रद्द करू शकत नाही”

“ट्रम्प यांची स्तुती करण्याच्या ऑलिंपिक खेळात शरीफ सुवर्णपदकासाठी आघाडीवर”

श्रेयस अय्यरने बॅकवर्ड पॉइंटवरून धावताना अ‍ॅलेक्स कॅरीला बाद करण्यासाठी एक जबरदस्त झेल घेतला, पण तो झेलताना त्याच्या डाव्या बरगडीला दुखापत झाली. ड्रेसिंग रूममध्ये परतल्यानंतर लगेचच त्याला तीव्र अस्वस्थता जाणवू लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्या प्लीहाला (spleen) दुखापत झाल्याचे समोर आले. बीसीसीआयची वैद्यकीय टीम श्रेयस याच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

Exit mobile version