सूर्यकुमार यादव आयकॉन खेळाडू!

सूर्यकुमार यादव आयकॉन खेळाडू!

मुंबईच्या क्रिकेट विश्वात पुन्हा एकदा धडाकेबाज पर्वाची सुरुवात होणार आहे! टी२० मुंबई लीगच्या तिसऱ्या सत्रासाठीची नीलामी ७ मे रोजी मुंबईत होणार आहे. ८ संघांची ही स्पर्धा २६ मे ते ८ जून दरम्यान वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.

या वेळी नजरा लागल्या आहेत आयुष म्हात्रे या १७ वर्षीय नवोदितावर, ज्याने आयपीएल २०२५ मध्येच प्रेक्षकांची मने जिंकली. त्याचबरोबर अंगकृष रघुवंशी, तनुश कोटियन आणि मुशीर खान यांसारखे खेळाडूही चर्चेत आहेत.

२८० खेळाडूंचा पूल तयार करण्यात आला असून, यात सिद्धेश लाड, शम्स मुलानी यांसारखे अनुभवी दिग्गजही आहेत.

⚡आइकॉन खेळाडूंची यादी:

🎯 खेळाडूंचे ३ वर्ग:

१. वरिष्ठ खेळाडू – ₹५ लाख मूळ किंमत
२. उभरते खेळाडू – ₹३ लाख मूळ किंमत
३. विकास गटातील खेळाडू – ₹२ लाख मूळ किंमत

प्रत्येक संघाला किमान १८ खेळाडूंचा संघ तयार करावा लागेल, ज्यात ४ वरिष्ठ, ५ उभरते आणि ५ विकास खेळाडू असणे बंधनकारक आहे. आइकॉन खेळाडूंचा करार ₹२० लाखांवर निश्चित करण्यात आला आहे.

🧒 युवा संधी:

प्रत्येक संघाला १ सप्टेंबर २००५ नंतर जन्मलेल्या किमान २ खेळाडूंना विकत घ्यावे लागेल, आणि त्यातील किमान १ खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान द्यावं लागेल.

💰 बजेट माहिती:

प्रत्येक संघाकडे ₹१ कोटींचा पर्स असून त्यातील किमान ₹८० लाख खर्च करणं आवश्यक आहे.

Exit mobile version