भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन क्रिकेट महासत्तांमध्ये १९८० ते २०२५ दरम्यान एकूण १५२ वनडे सामने खेळले गेले आहेत. या दीर्घ क्रिकेट इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-५ फलंदाजांमध्ये तब्बल चार भारतीयांचा समावेश आहे. चला जाणून घेऊया कोण आहेत हे पाच दिग्गज!
सचिन तेंडुलकर :
‘मास्टर ब्लास्टर’ सचिनने १९९१ ते २०१२ दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७१ सामने खेळले. या काळात त्याने ४४.५९ च्या सरासरीने एकूण ३,०७७ धावा केल्या. सचिनच्या बॅटमधून ९ शतकं आणि १५ अर्धशतकं झळकली. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक ३३० चौकार ठोकण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
विराट कोहली :
‘रन मशीन’ विराटने २००९ ते २०२५ या काळात ५० सामन्यांत ५४.४६ च्या शानदार सरासरीने २,४५१ धावा जमवल्या. त्यात ८ शतकं आणि १५ अर्धशतकांचा समावेश आहे. कोहलीच्या सातत्यपूर्ण फलंदाजीमुळे तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
रोहित शर्मा :
‘हिटमॅन’ रोहितने २००७ ते २०२५ दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४६ सामने खेळले. ५७.३० च्या भक्कम सरासरीने त्याने २,४०७ धावा केल्या, ज्यात ८ शतकं आणि ९ अर्धशतकं आहेत.
२ नोव्हेंबर २०१३ रोजी बंगळुरूमध्ये झालेल्या सामन्यात रोहितने केवळ १५८ चेंडूंमध्ये १६ षटकार आणि १२ चौकारांच्या मदतीने २०९ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली होती.
हेही वाचा:
तंदुरी रोटीवर थुंकणाऱ्या अदनानला अटक!
२० वर्षांपासून मुंबईत राहत होता घुसखोर बांगलादेशी, असा सापडला!
भंगार विक्रेत्याकडून लाच घेणारा पंजाबचा डीआयजी अटकेत
जगातील चांदी खेचून घेणारा हस्तर कोण?
रिकी पॉन्टिंग :
ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पॉन्टिंगने १९९५ ते २०१२ दरम्यान भारताविरुद्ध ५९ वनडे खेळले. ४०.०७ च्या सरासरीने त्याने २,१६४ धावा केल्या. या काळात पॉन्टिंगने ६ शतकं आणि ९ अर्धशतकं झळकावली.
महेंद्रसिंग धोनी :
भारताला विश्वचषक विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार ‘कॅप्टन कूल’ एम. एस. धोनीने २००६ ते २०१९ दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५५ सामने खेळले. ४८ डावांमध्ये त्याने ४४.८६ च्या सरासरीने १,६६० धावा केल्या. माहीच्या बॅटमधून २ शतकं आणि ११ अर्धशतकं नोंदली गेली.
