आयपीएल २०२६ मधील १३व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर २७ धावांनी मात करत शानदार विजय नोंदवला. पावसामुळे सामना ११-११ षटकांचा खेळवण्यात आला. या सामन्यात मॅच-विनिंग खेळी करणाऱ्या यशस्वी जायसवालला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
सामन्यानंतर बोलताना जायसवालने आपल्या फलंदाजीच्या दृष्टिकोनाबद्दल सांगितले की,
“मी सतत नवीन शॉट्सवर काम करतो आणि संघाच्या गरजेनुसार माझा खेळ बदलतो. पावरप्ले फक्त ३ षटकांचा असल्याने कोणत्या गोलंदाजाला लक्ष्य करायचे याचा विचार केला. दीपक चाहरला टारगेट करण्याचा प्लॅन होता.”
त्याने पुढे सांगितले की,
“मैदानावर असताना मी पूर्णपणे खेळात गुंतलेला असतो. परिस्थितीनुसार कोणते शॉट्स खेळायचे आणि कोणत्या गोलंदाजावर आक्रमण करायचे याचा सतत विचार करत असतो.”
जायसवालची दमदार खेळी
जायसवालने या सामन्यात
- ३२ चेंडूत नाबाद ७७ धावा
- ४ षटकार, १० चौकार
अशी शानदार खेळी साकारत राजस्थानला भक्कम धावसंख्या उभारून दिली.
त्याच्यासोबत सलामीला आलेल्या वैभव सूर्यवंशीने १४ चेंडूत ३९ धावा करत आक्रमक सुरुवात दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ५ षटकांत ८० धावा जोडल्या.
राजस्थानचा मोठा स्कोअर
राजस्थान रॉयल्सने
११ षटकांत ३ बाद १५० धावा
असा आव्हानात्मक स्कोअर उभा केला.
मुंबईची निराशाजनक फलंदाजी
१५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली.
- संघ ११ षटकांत ९ बाद १२३ धावाच करू शकला
आणि सामना २७ धावांनी गमावला
गोलंदाजांची प्रभावी कामगिरी
राजस्थानकडून
- नांद्रे बर्गर, संदीप शर्मा, रवि बिश्नोई – प्रत्येकी २ विकेट
- जोफ्रा आर्चर, तुषार देशपांडे – प्रत्येकी १ विकेट
वैभववरही स्तुतीचा वर्षाव
जायसवालने आपल्या जोडीदार वैभव सूर्यवंशीचे कौतुक करत म्हटले,
“तो उत्कृष्ट खेळतोय. आम्ही एकमेकांशी सतत संवाद ठेवतो आणि सकारात्मक वातावरण ठेवतो.”







