२६/११ च्या हल्ल्या आधी सुरु होता काँग्रेस – हाफीज सईदचा रोमान्स |

२६/११  च्या हल्ल्या आधी सुरु होता काँग्रेस - हाफीज सईदचा रोमान्स | Dinesh Kanji | Congress |

मुंबईवर २६/११ चा हल्ला झाला, तेव्हा देशात यूपीएचे सरकार होते, राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचे सरकार होते. हा हल्ला सुरू असताना मुंबईतील एक हस्तक दहशतवाद्यांना मदत करत होता, असा गौप्यस्फोट माजी गृहसचिव राम प्रधान यांनी केला होता. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या हत्येप्रकरणी तिहार तुरुंगात सजा भोगत असलेला खतरनाक दहशतवादी यासिन मलिकने आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. काँग्रेस सरकार २६ नोव्हेंबर २००८ मध्ये (२६/११) झालेल्या हल्ल्याचा मास्टर माईंड हाफीज सईद याच्या संपर्कात २००६ पासून होते. पहेलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला स्पष्ट ईशारा दिला आहे की, दहशतवाद आणि व्यापार एकत्र सुरू राहू शकत नाही, पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही. पाकिस्तानचे नेते संवादासाठी नाक रगडतायत, परंतु मोदी त्यांच्याकडे ढुंकूनही बघत नाहीत. याचे दुसरे टोक यूपीए सरकारच्या काळात होते. यूपीए सरकारचे नेते पाकिस्तानातील नेतेच काय, तिथल्या दहशतवाद्यांशी चर्चा करण्यासाठीही सरपटत होते. मुंबईत झालेल्या २६/११ च्या भीषण हल्ल्याआधी यूपीएचे सरकार हल्ल्याचा मास्टर माईंड हाफीज सईद याच्या संपर्कात होते. त्याच्यासाठी एका बाजूला गुप्तचर संस्था आणि दुसऱ्या बाजूला दहशतवादी यासिन मलिक याला कामाला लावण्यात आले होते. दिल्ली उच्च न्यायालयात यासिन मलिक याने प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. या प्रतिज्ञापत्रात त्याने केलेले दावे खळबळजनक आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात देशात काय खेळ चालले होते, याचा भांडाफोड या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. काँग्रेसचे नेते भारतातील दहशतवाद्यांच्या गळ्यात गळे घालत होते आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांशी चर्चा करण्यासाठी याच दहशतवाद्यांचा वापर करत होते. २००६ पुढच्या घडामोडी जर बारकाईने अभ्यासल्या तर असे लक्षात येते की, दहशतवाद्यांच्या सोबत काँग्रेसचे जबरदस्त असे साटेलोटे होते.

Exit mobile version