चांदा ते बांदा…. आंदोलनजीवी नेत्यांनाही मकोका लावणार काय?

चांदा ते बांदा…. आंदोलनजीवी नेत्यांनाही मकोका लावणार काय? | Dinesh Kanji | Devendra Fadnavis |

विधी मंडळामध्ये सिंधुदुर्गला नागपूरशी जोडणाऱ्या शक्तीपिठ मार्गाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भूमिका मांडली. गेल्या वर्षी या मार्गाला विरोध करण्यासाठी कोल्हापूरचे काँग्रेसचे खासदार शाहू महाराज रस्त्यावर उतरले होते. शेतकऱ्यांची, मच्छिमारांची ढाल करून विकास प्रकल्पांना कोलदांडा घालणारे असे आंदोलनजीवी नेते चांद्यापासून बांद्यापर्यंत आहेत. विकास प्रकल्पात मोडता घालणाऱ्यांवर मकोका लावणार असा इशारा मुख्यमंत्र्यांनी अलिकडेच एका मुलाखतीत दिला होता. राजकीय नेत्यांवर हा बडगा चालवला जाणार काय? हा महत्वाचा प्रश्न आहे.

Exit mobile version