मालामाल करतोय भारताचा प्लान बी |

मालामाल करतोय भारताचा प्लान बी | Dinesh Kanji | E20 Fuel | Green Energy India |

स्वस्त इंधन ही भारताची गरज आहे. गेली दोन वर्षे आपल्याला रशियाकडून स्वस्त तेल मिळते आहे. ते मिळू नये म्हणून अमेरिका-युरोपातील देशांनी कंबर कसली आहे. सुदैवाने भारताने इंधन सुरक्षेच्या दृष्टीने गेल्या काही वर्षांत आपण एक सर्वंकष रणनीती अत्यंत डोळसपणे राबवित आहोत. एका बाजूला देशात तेल संशोधनासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. दुसऱ्या बाजूला पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण आपण वाढवत नेले आहे. हे धोरण आपले तेलावरील अवलंबित्व कमी करणारे आहे. शेतकऱ्याला आणि पर्यायाने आपल्या अर्थव्यवस्थेला बाळसे आणणारे आणि कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणारे आहे.

Exit mobile version