देशद्रोहाचे समर्थन हा गुन्हा नाही का?

देशद्रोहाचे समर्थन हा गुन्हा नाही का? | Dinesh Kanji | CJP Protest | Saurav Das | Abhijeet Dipke |

सोशल मीडियाच्या माध्यमातून या देशात देशद्रोही विचारांचा घाऊक प्रमाणात रतीब घातला जातोय. अशा पोस्टविरुद्ध कारवाई होत नसल्यामुळे, ‘यालाच अभिव्यक्ति स्वातंत्र्य म्हणतात’, ‘हे अगदीच नॉर्मल आहे’, ‘यात काहीच गैर नाही’, असे इतरांना वाटणे स्वाभाविक आहे. लोकशाही व्यवस्थेअंतर्गत आपण कायद्याची जी चौकट स्वीकारली आहे, त्यातही अशी अभिव्यक्ती गुन्हेगारी स्वरुपाची मानली गेली आहे. परंतु त्याच लोकशाही व्यवस्थेतील कमकुवतपणामुळे असे लोक गजाआड होण्याऐवजी युवकांचे तथाकथित आय़कॉन बनले आहेत. सौरव दास हे त्याचे खूप मोठे उदाहरण आहे. कॉकरोच जनता पार्टी हा एक ताजा हिंदूविरोधी, देशविरोधी प्रयोग आहे. या देशबुडव्यांना विद्यार्थ्यां उरावर बसवण्याचे काम काही लोक करतायत. कॉकरोच जनता पार्टी अस्तित्वात येण्यापूर्वी यांचे कारनामे पाहीले तर यांचा हिंदू विरोध, देश विरोध, विदेशी शक्तींशी हातमिळवणी लक्षात यायला फार वेळ लागणार नाही. सीजेपीचा प्रवक्ता सौरव दास याने तर वारंवार देशद्रोह्यांवर होणाऱ्या कारवाईबाबत हळहळ व्यक्त केली आहे. त्यांचे समर्थन केले आहे. तरीही त्याच्यावर कारवाई का झाली नाही, हा यक्ष प्रश्न आहे.

Exit mobile version