28 C
Mumbai
Friday, August 7, 2026
घरक्राईमनामाबोरीवलीत वाढदिवसाच्या पार्टीत मध्यरात्री हवेत फायरिंग

बोरीवलीत वाढदिवसाच्या पार्टीत मध्यरात्री हवेत फायरिंग

इनोव्हाच्या बोनेटवर केक कापणाऱ्या १० जणांना अटक

Google News Follow

Related

बोरीवली पश्चिमेकडील गोराई-२ परिसरात वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान सार्वजनिक शांततेचा भंग करत रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या १० संशयितांना बोरीवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ५ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री १२:३० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला असून, याप्रकरणी बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरकुल को. ऑ. हौ. सोसायटी, सुविध्या स्कुल जवळ, गोराई-२ येथे आकाश रामकृपाल गुप्ता (वय २६ वर्षे) याच्या वाढदिवसाची पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत खालीलप्रमाणे बेकायदेशीर कृत्य करण्यात आले.
इनोव्हा कार रस्त्याच्या मध्यभागी चुकीच्या पद्धतीने उभी करून रहदारीला अडथळा निर्माण करण्यात आला. मुख्य आरोपी आकाश गुप्ता याने मित्रांना जमवून गाड्यांच्या बोनेटवर स्वतःचा वाढदिवसाचा केक कापला.जतिन नविन शर्मा याच्या मालकीची ‘बेबी एअरगन’ विजेश उपाध्याय याने मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा बेदरकारपणे हवेत चालवली, ज्यामुळे सार्वजनिक ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले.
हे ही वाचा:
विमानाचे आपत्कालीन दार उघडण्याचा प्रयत्न

‘जेन झी’ चा आवाज ऐकला गेला पाहिजे

बनावट कागदपत्रांच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही!

‘क्या बोलती पब्लिक’ कॉक्रोच जनता पार्टीची नवी मोहिम

आकाश रामकृपाल गुप्ता (वय २०),जतीन नविन शर्मा (वय २६), विजेश विजयप्रकाश उपाध्याय (वय २६), विक्रम मांगीलाल चौधरी उर्फ टॉमची (वय २९),ऐश्वर्य मधुकर गोमणे (वय २६),अजिंक्य जयंत आढाव (वय २४),जय धर्मेंद्र कपाडिया (वय २७),रोहन जगदीश पाटील (वय २७),मुंकूंद आसाराम थोरवे (वय २५), प्रशांत सुभाष हरिजन (वय २५) असे आरोपीचे नावे आहेत.
सदर प्रकरणाचा पुढील तपास बोरीवली पोलीस करीत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
326,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा