28.1 C
Mumbai
Thursday, August 6, 2026
घरस्पोर्ट्सदक्षिण आफ्रिकेत भारतीय महिलांचा कस लागणार

दक्षिण आफ्रिकेत भारतीय महिलांचा कस लागणार

Google News Follow

Related

भारतीय महिला क्रिकेट संघाचा डिसेंबर २०२६ मधील दक्षिण आफ्रिका दौरा अधिक रंगतदार झाला आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने सुधारित वेळापत्रक जाहीर करत या दौऱ्यात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेचा समावेश केल्याची घोषणा केली. फेब्रुवारी २०२७ मध्ये श्रीलंकेत होणाऱ्या पहिल्या आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी हा बदल करण्यात आला आहे.

भारतीय संघ ९ ते १२ डिसेंबरदरम्यान गकेबेरहा येथे एकमेव कसोटी सामना खेळेल. त्यानंतर १६, १९ आणि २२ डिसेंबर रोजी अनुक्रमे पार्ल, केपटाउन आणि ब्लॉमफोन्टेन येथे तीन वनडे सामने होतील.

यानंतर २६, २९ आणि ३० डिसेंबर रोजी बेनोनी आणि पोटचेफस्ट्रूम येथे तीन टी-२० सामने खेळवले जातील.

यापूर्वी एप्रिलमध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय महिला संघाला पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-४ असा पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे या दौऱ्यात त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी भारतीय संघाला मिळणार आहे.

सीएसएचे मुख्य कार्यकारी अधिकारी फोलेट्सी मोसेकी यांनी सांगितले की, भारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध तिन्ही प्रकारांत खेळल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाला आगामी महिला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी उत्तम तयारी करता येईल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
326,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा