28 C
Mumbai
Friday, November 20, 2026
घरस्पोर्ट्सउदय देशपांडे, संदीप चव्हाण याना जीवनगौरव

उदय देशपांडे, संदीप चव्हाण याना जीवनगौरव

मनोहर विचारे पुरस्करांचा अमृतमहोत्सव

Google News Follow

क्रीडा क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा  उमटवणाऱ्या पद्मश्री मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे आणि आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण यांना मनोहर विचारे प्रतिष्ठानच्या प्रतिष्ठेच्या जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. क्रीडा क्षेत्रातील तपस्वी योगदान आणि पत्रकारितेतील प्रदीर्घ, समर्पित कारकीर्द यांचा सन्मान करणारा हा सोहळा प्रतिष्ठानच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त आणि २५ व्या रौप्यमहोत्सवी मराठी गौरव पुरस्कार वर्षाचे औचित्य साधून शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात रंगणार आहे.

भारतीय पारंपरिक खेळ मल्लखांबाला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचणारे पद्मश्री उदय देशपांडे यांच्या कार्याचा जीवनगौरव पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.

क्रीडा पत्रकारितेला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेणाऱ्या संदीप चव्हाण यांचाही जीवनगौरव पुरस्काराने सन्मान होणार आहे. सहा ऑलिम्पिक स्पर्धांसह अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे वार्तांकन करणाऱ्या चव्हाण यांनी आपल्या लेखणीने क्रीडा विश्वातील अनेक ऐतिहासिक क्षण वाचकांपर्यंत पोहोचविले.

या पुरस्कार सोहळ्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू प्रवीण आमरे, अर्जुन पुरस्कार विजेते ज्येष्ठ बुद्धिबळ प्रशिक्षक प्रवीण ठिपसे आणि महाराष्ट्राचे पहिले भारतश्री व राष्ट्रीय कबड्डीपटू विजू पेणकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. क्रीडा क्षेत्रातील विविध पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे पुरस्कार सोहळ्याला विशेष प्रतिष्ठा लाभणार आहे.

हे ही वाचा:

प्रोटीन पावडर विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाची नजर

युद्ध नको, जागतिक शांततेसाठी संस्कृतींचा संवाद हवा!

राहुल गांधींना नेमकं झालंय काय?

शेअर बाजारात तुफानी तेजी! सेन्सेक्स ९०० अंकांनी वधारला

प्रतिष्ठानच्या २५ व्या रौप्यमहोत्सवी पुरस्कार वर्षाचे औचित्य साधून विविध खेळांमधील प्रशिक्षक, खेळाडू, संघटक आणि पत्रकारांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये द्रोणाचार्य पुरस्कार विजेते क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रघुनंदन गोखले, पद्मश्री अनुपमा गोखले, शिवछत्रपती पुरस्कार विजेते कॅरम संघटक अरुण केदार, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या कॅरमपटू अनुपमा केदार, अर्जुन पुरस्कार विजेत्या जलतरणपटू आरती प्रधान यांचा समावेश आहे.

क्रीडा पत्रकारितेतील योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार सुहास जोशी, प्रल्हाद नाखवा, अशोक बोभाटे आणि अश्विन बापट यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच मिड-डेचे छायाचित्रकार अतुल कांबळे, क्रिकेट संघटक जयेश कुलकर्णी आणि क्रिकेट गुणलेखक दीपक जोशी यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांना गौरविण्यात येणार आहे. मैदानावरील कामगिरीइतकेच पडद्यामागे खेळासाठी झटणाऱ्या व्यक्तींचे योगदान महत्त्वाचे असते, याची जाणीव करून देणारा हा सन्मान सोहळा ठरणार आहे.

शिवछत्रपती पुरस्कार विजेते शरीरसौष्ठव प्रशिक्षक मधुकर धीरत यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात येणार आहे. क्रीडा क्षेत्रातील त्यांची प्रदीर्घ साधना, प्रशिक्षणातील योगदान आणि शरीरसौष्ठव खेळासाठी केलेले कार्य यांचा गौरव या निमित्ताने केला जाणार आहे. याशिवाय क्रीडा, शिक्षण, सामाजिक कार्य आणि विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणवंतांना मराठी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

  1. कै. मनोहर विचारे प्रतिष्ठानचे संस्थापक व अध्यक्ष अजय मनोहर विचारे यांच्या पुढाकाराने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. समाजासाठी निःस्वार्थ योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करणे, नव्या पिढीसमोर त्यांच्या कार्याचा आदर्श ठेवणे आणि विविध क्षेत्रांतील गुणवंतांना प्रतिष्ठेचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा प्रतिष्ठानच्या पुरस्कार उपक्रमामागील उद्देश आहे. २५ वर्षांच्या पुरस्कार परंपरेचा रौप्यमहोत्सवी टप्पा गाठताना हा गौरव सोहळा केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित न राहता कर्तृत्व, समर्पण आणि प्रेरणेचा उत्सव ठरणार आहे.
National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा