पाकिस्तानमध्ये पुन्हा बालिका वधूंचा बाजार ?

पाकिस्तानमध्ये पुन्हा बालिका वधूंचा बाजार ? | Dinesh Kanji | India | Pakistan

गोष्टी फार जुनी नाही. फक्त तीन वर्षांपूर्वीची आहे. पाकिस्तानचा एक मंत्री एहसान इक्बाल याने जनतेला सल्ला दिला होता. चहा थोडा कमी प्या. पाकिस्तानात चहा आयात करण्यासाठी ४०० दशलक्ष डॉलर खर्च करावे लागतात. चहा कमी केल्यास हा खर्चही कमी होईल, असे त्याने सांगितले होते. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची परीस्थिती आणखी बिकट आहे. चहा आयात करण्यासाठी तिजोरीत पैसे नाहीत, भारताने सिंधू जल करार स्थगित केल्यामुळे पाण्याचेही वांधे झालेत. पाकिस्तानींच्या चहावर दुहेरी संकट निर्माण झाले आहे. २०२२ च्या पूरानंतर पाकिस्तानमध्ये कोवळ्या मुली विवाहाच्या नावाखाली विकण्याचे घाऊक प्रकार झाले होते. पाण्याच्या दुर्भीक्षामुळे पुन्हा तेच होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version