हे साहीत्य संमेलन की, भंपकांचा तमाशाचा?

हे साहीत्य संमेलन की, भंपकांचा तमाशाचा? | Dinesh Kanji | Sharad Pawar | Tara Bhavalkar | Modi

दिल्लीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुढाकाराने आयोजित केलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साहित्याच्या चर्चेपेक्षा भलत्याच कारणांना गाजते आणि वाजते आहे. राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या पैशांचा वापर करून ही शाही संमेलने भरवली जातात. त्यात राजकीय नेत्यांची उठबस असणारच. त्यामुळे ही संमेलने साहीत्यप्रेमींची चळवळ न बनता, राजकीय चिखलफेकीचा अड्डा, तमाशाचा फड बनला आहे. तमाशातील हे सवाल जवाब वाचकांचे उद्बोधन करण्यात अपयशी ठरत असले तरी मनोरंजनात मात्र कणभर कमतरता आलेली नाही.

Exit mobile version