तुमचा कचरा नको,ट्रम्प यांचे डील झिडकारले…

तुमचा कचरा नको,ट्रम्प यांचे डील झिडकारले... | Dinesh Kanji | Donald Trump | Yusuf Tuggar |

कधी काळी अमेरिकेला असलेली चमक उतरली. यांचे अर्थकारण सध्या उतरणीच्या दिशेने आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सगळ्या जगाशी पंगा घेतला आहे. या सगळ्या शिळ्या बातम्या झाल्या. जगाच्या अर्थकारणात ज्या देशाचा क्रमांक ५० च्याही पुढे जातो, अशा देशाने ट्रम्प यांचा तोरा उतरवला आहे. त्यांनी दिलेली एक भिकारडी ऑफर नाकारली आहे. स्पष्ट नकार दिला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिकेची इतकी दुरावस्था कधीच नव्हती. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कायम खुषमस्कऱ्यांवर मेहरबान असतात. पाय चोळणाऱ्या व्यक्तिला त्यांच्या निकटवर्तियांमध्ये स्थान मिळते. जगातील नेत्यांमध्येही ते खुशामत करणाऱ्यांना शोधत असतात. भारत, चीन, रशिया, ब्राझिल सारख्या बड्या देशांना हे करण्याची गरज नसते. ते करणारही नाहीत. पाकिस्तानसारख्या कफल्लक देशांचा नाईलाज असतो. छोटे देश किती मजबूर असतात पाहा. अर्मेनिया-अझरबैजान या दोन्ही शत्रू देशांना ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये निमंत्रित केले. हे शत्रू देश आहेत. परंतु यांच्यात सध्या कोणतीही लढाई सुरू नाही. तरीही ट्रम्प यांनी त्यांच्यात युद्धबंदी घडवली. युद्ध सुरू नसताना युद्धबंदी घडवण्याचे विश्वविक्रम ट्रम्प यांनी घडवला. मग दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी मिळून ट्रम्प यांना शांततेचे नोबेल देण्याची मागणी त्यांच्याच समोर केली. एखादा पोट धरून हसेल असा हा किस्सा आहे. ट्रम्प स्वत: च्या किती प्रेमात आहेत. त्यांच्या आरत्या ओवाळल्या जाव्यात म्हणून ते काय काय करत असतात, याची ही झलक. परंतु त्यांच्या ध्यानीमनी नसताना आफ्रीकेतील एका देशाने त्यांच्याशी पंगा घेतला. जागतिक राजकारणात आपल्या भौगोलिक स्थानामुळे, साधन संपन्नेतेमुळे किंवा अशाच काही कारणामुळे जगातील प्रत्येक देश महत्वाचा झाला आहे. पाकिस्तानसारख्या दरीद्री देशाचेही अमेरिकेच्या लेखी महत्व आहेच की. आफ्रीकेतील असा

Exit mobile version