एमआय-५ शबानाला रिपोर्ट करणार |

एमआय-५ शबानाला रिपोर्ट करणार | Dinesh Kanji | Shabana Mahmood | Britain |

ब्रिटनच्या गृहमंत्री पदी एका अशा महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे, जिची मूळं पाकव्याप्त काश्मीरात आहेत. जिला हिंदुराष्ट्राची एलर्जी आहे. ही महिला पॅलेस्टाईन समर्थन आहे. ही इस्त्रायल विरोधी आहे. हाती कुराण घेऊन तिने अल्लाच्या नावाने गृहमंत्री पदाची शपथ घेतली आहे. म्हणजे यापुढे ब्रिटनची एमआय-५ ही गुप्तचर संघटना अशा व्यक्तिच्या हाती असेल जी उघड भारत विरोधी आहे. तिचे नाव आहे, शबाना महमूद. धर्माच्या आधारावर भारताचे तुकडे करणाऱा ब्रिटन आता त्याच वाटेने जाताना दिसतो आहे. कधी काळी जगावर राज्य करणाऱ्या या देशाचे झपाट्याने इस्लामीकरण होते आहे. अनेक महत्वाच्या पदावर मुस्लीमांचा कब्जा झालेला आहे. लंडनचा महापौर सादीक खान, स्कॉटलंडचा माजी मंत्री हमझा युसूफ, मंत्री शाहीद मलिक, साजिद जाविद अशी अनेक नावे सांगता येतील त्यात एका नव्या नावाची भर पडलेली आहे. शबाना महमूद यांचा जन्म १७ सप्टेंबर १९८० चा. म्हणजे आपले पंतप्रधान आणि या बाईंचा वाढदिवस सारखा. त्या बॅरिस्टर आहेत. त्यांचा जन्म बर्मिंगहॅम येथे झाला असला तरी त्यांचे आई-वडील पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील मीरपूरचे आहेत. शबाना यांचे हे पाक कनेक्शन हीच भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

Exit mobile version