नरेंद्र मोदी नावाच्या माणसाला सत्तेवरून हटवण्याचे प्रयत्न २००२ पासून सुरू आहेत. हे प्रयत्न देशात झाले, विदेशातून झाले. देशातील प्रयत्नांना विदेशातून समर्थन मिळाले. जंग, जंग पछाडले तरीही मोदींना हटवण्यात यश आले नाही. गेली २३ वर्षे हा माणूस तळ ठोकून बसलेला आहे. एण्टी इन्कम्बन्सी नावाची राजकीय वाळवी त्यांना स्पर्श करू शकली नाही. त्यांचे विरोधक एक तर पराभूत होतायत, नांगी टाकतायत किंवा शरण येतायत. असे काय आहे, या माणसात जे अजेय आहे? जे त्यांच्या हितशत्रूंना नष्ट करता येत नाही? ज्यामुळे जग म्हणते आहे ‘मोदी इज द बॉस’. मोदींचा आज अमृत महोत्सवी वाढदिवस. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एन्थनी ब्लिंकन, ईस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी व्हीडीयो मेसेज द्वारे मोदींचे अभिष्टचिंतन केले आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासह जगभरातील नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत
