पवार साहेब तुम्ही तरी स्वाभिमानाच्या बाता करू नका

पवार साहेब तुम्ही तरी स्वाभिमानाच्या बाता करू नका | Amit Kale | Tara Bhavalkar | Delhi |

एखाद्याला थोडा तरी स्वाभिमान असता तर मंत्रिमंडळातून राजीनामा दिला असता’, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना उद्देशून काल हे वक्तव्य केले आहे. पवारांनी स्वाभिमानाच्या बाता कराव्यात यापेक्षा मोठा विनोद काय असू शकतो? मविआच्या सत्ताकाळात जेव्हा मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले, तेव्हाही त्यांचा स्वाभिमान जागा झाला नाही, कारण तेव्हा पवार त्यांच्या पाठीशी पहाडासारखे उभे होते. आरोप करणाऱ्या व्यक्तिला चेपण्याचा प्रयत्न करीत होते. पवारांच्या फूटपट्ट्या प्रत्येक घडीला प्रत्येक व्यक्तगणिक कशा बदलतात हे त्यांनी एकाच दिवसात दोनदा सिद्ध केले.

Exit mobile version