अमेरिकेतील ‘सांबा’ शिळेवरून उतरला..

अमेरिकेतील 'सांबा' शिळेवरून उतरला... Dinesh Kanji | Elon Musk | Trump | America |

राजकीय नेता हा कोणत्याही पक्षाचा असो त्याचा एक खंदा समर्थक असतोच. अत्यंत विश्वासू, जवळचा. त्याची राजकीय सत्ता या नंबर दोनच्या बळावर स्थिरस्थावर झालेली असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची साथ लाभली. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यासोबत अहमद पटेल होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मनोहर जोशी होते. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांना स्पेसेक्स, टेस्लाचे मालक, चालक उद्योगपती इलॉन मस्क यांची साथ होती. त्यांनी डीपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशिअन्सी (DOGE) या खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. ट्रम्प यांना हा मोठा झटका आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या ‘शोले’तला ‘सांबा’ अखेर त्या विशाल खडकावरून उतरला आहे.

Exit mobile version