खदखदणारा युरोप भारतासोबत येतोय… |

खदखदणारा युरोप भारतासोबत येतोय... | Dinesh Kanji | Donald Trump | S Jaishankar |

दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि युरोपियन देशांची गट्टी जमली. गेल्या आठ दशकांच्या या संबंधांना ट्रम्प नावाचे ग्रहण लागलेले आहे. अमेरिकेचा खजिना भरण्यासाठी युरोपिन देशांचा वापर दुभत्या गाईसारखा केला जातो आहे. कधी काळी जगावर राज्य करणाऱ्या या देशांना आज अमेरिकेने बटीक बनवले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाबाबत युरोपियन देशांत प्रचंड खदखद आहे. जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भारत भेटीतून ही खदखद स्पष्टपणे व्यक्त झालेली आहे. अमेरिकेला असे वाटते की युरोपनेही भारतावर तुटून पडावे. म्हणजे ट्रम्प यांना तसे वाटते आहे. परंतु युरोपातील देश भारताला मिठी मारण्यासाठी आतुर झालेले आहे. ट्रम्प यांना डोक्यात जाळ निर्माण व्हावा अशी विधाने या देशांचे नेते भारताबाबत करताना दिसतायत. अमेरिकेने ज्या प्रमाणे ५० टक्के टेरीफ भारतावर आकारले आहे, त्याप्रमाणे युरोपने सुद्धा भारतावर सेकंडरी टेरीफ लावावे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे भारताला अशा प्रकारे चेपता येईल अशा प्रकारच्या सूचना व्हाईट हाऊसने युरोपला दिल्या आहेत. युरोपातील नेत्यांनी मात्र या सूचना केराच्या टोपलीत भिरकावण्याच्या लायकीच्या असल्याचे संकेत दिले आहेत. जर्मनीचे परराष्ट्र मंत्री योहान वॅडफूल भारतात आले आहेत. भारत हा विसंबून राहता येईल असा मित्र असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. हा अमेरिकेला दिलेला टोला आहे. अमेरिकेकडून युरोपियन देशांची जी लूट होते आहे, त्यातून ही खदखद बाहेर येते आहे.

Exit mobile version